Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिमोग्लोबिन विकारांच्या निदानासाठी पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.च्या मदतीने अद्ययावत...

हिमोग्लोबिन विकारांच्या निदानासाठी पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.च्या मदतीने अद्ययावत एचपीएलसी मशिन कार्यान्वित

पुणे,27 नोव्हेंबर 2025 : केईएम हॉस्पिटल येथे नुकतेच एचपीएलसी व्हेरिएंट 2 हे मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. ही अद्ययावत निदान प्रणाली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.तर्फे दान करण्यात आली असून यामुळे हिमोग्लोबिन विकार व थॅलेसेमियाच्या निदान सेवांना अधिक बळकटी मिळेल.

 

हिमोग्लोबिनचे विकार हे भारतात एक गंभीर सार्वजनिक आव्हान असून यामुळे अनेक नवजात शिशू,मुले,किशोरवयीन मुली व गर्भवती महिलांवर याचा प्रभाव दिसून येतो. केईएम हॉस्पिटल पुणे येथील पॅथॉलॉजी विभाग गेली दोन दशके हिमोग्लोबिन इलेक्ट्रो फोरेसिस ही चाचणी परवडणाऱ्या दरात प्रदान करत आली आह,ज्यामुळे लवकर निदान आणि योग्य वेळेत व्यवस्थापन शक्य होत आले आहे.

 

केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या की,एचपीएलसी व्हेरिएंट 2 मशिन प्रस्थापित होणे हा हिमोग्लोबिन विकारांविरूध्द आमच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.च्या साहाय्यामुळे अधिक वेगाने, अचूक व परवडणाऱ्या दरात निदान व व्यवस्थापन सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही अधिक सक्षम झालो आहोत.

 

त्या पुढे म्हणाल्या की, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि मुकूल माधव फाऊंडेशन हे गेली दोन दशकांपासून अधिक काळ आमचे विश्वासू,सहकारी राहिले आहेत.कै.डॉ.आनंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग,ओपीडी,नवजात शिशु चिकित्सा आणि अनेक विभागांना यामुळे सहकार्य लाभले आहे.मुकुल माधव फाऊंडेशनच्या दीर्घकालीन वचनबध्दतेमुळे आणि मदतीमुळे केईएम हॉस्पिटलमधील सेवांच्या सातत्याने आधुनिकीकरणाला मोलाचा हातभार लागला असून यामुळे रूग्ण सेवेला अधिक बळकटी मिळाली आहे.

 

केईएम हॉस्पिटल पुणेमधील हेमॉटोलॉजिस्ट डॉ.रमा मंचंदा म्हणाल्या की, या प्रणालीच्या मदतीने थॅलेसेमिया सारख्या विकारांचे वाहक लवकर ओळखण्यास मदत होईल आणि याची कुटुंब आणि एकंदर समाजाला मदत होईल.

 

मुकूल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या की,उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावी हे आमचे ध्येय आहे.ही मदत असंख्य कुटुंबांसाठी अधिक निरोगी भविष्य घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.रूग्णांना अधिक चांगले परिणाम मिळावेत व हिमोग्लोबिन विकारांच्या निदान सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी केईएम हॉस्पिटल,पुणे सोबत सहकार्याचा आम्हाला अभिमान आहे. गेली अनेक वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.आणि मुकूल माधव फाऊंडेशन थॅलेसेमियाग्रस्त अशा 300 हून अधिक मुलांना दरमहा मेडिकल फिल्टर्स,औषधे आणि निरंतर सेवांमध्ये साहाय्य करत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधील कॉलेजेसमधील थॅलेसेमिया व मधुमेहासंदर्भात राज्यव्यापी जागरूकता उपक्रमाद्वारे आम्ही प्रतिबंधाला प्राधान्य देत आहोत.सुधारित निदान सेवांबरोबरच शाश्वत जागरूकता उपक्रमांद्वारे अनुवंशिक विकारांचा भार आपण कमी करू शकू.तसेच पुढील पिढीचे माहिती व योग्य वेळेत निदानाद्वारे सक्षमीकरण करू शकू अशी आम्हाला आशा आहे.

 

हा उपक्रम म्हणजे आरोग्य सुधारणा आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्याच्या केईएम हॉस्पिटल व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.च्या सामायिक बांधिलकीला अधोरेखित करते.त्याचबरोबर आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधा,निदान व उपचारक्षमता अधिक मजबूत करणे आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत उच्च दर्जाची व किफायतशीर आरोग्य सेवा पोहचविणे ही कटिबध्दता

दर्शविते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments