Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमदर्स रेसिपीने आपल्या जिंजर गार्लिक पेस्टच्या नव्या कॅम्पेनच्या माध्यमातून भारताला 'मा सब...

मदर्स रेसिपीने आपल्या जिंजर गार्लिक पेस्टच्या नव्या कॅम्पेनच्या माध्यमातून भारताला ‘मा सब जानती है, मा सच जानती है’ याची आठवण करून दिली

पुणे, नोव्हेंबर 2025 – मदर्स रेसिपी हा अनेक पिढ्यांपासून भारतीय कुटुंबांचा विश्वास असलेला भारतातील स्थानिक ब्रँड असून, त्यांनी त्यांच्या जिंजर गार्लिक पेस्टसाठी नवे कॅम्पेन सुरू केले आहे. ‘मा सब जानती है, मा सच जानती है’ (‘आईला सगळं कळतं आणि आईला खरं काय आहे हे समजतं’), ही या कॅम्पेनची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्वयंपाकामधील शुद्धता, सुलभता आणि प्रामाणिकता यावर असलेला आईचा विश्वास, याचे या कॅम्पेनमध्ये खूप सुंदर प्रकारे दाखविण्यात आले आहे. कारण या मूल्यांच्या आधारेच आई स्वयंपाकघरातील जिन्नसांची निवड करत असते.

जिंजर गार्लिक पेस्ट हे मदर्स रेसिपीच्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकले जाणारे किचन प्रॉडक्ट्सपैकी एक आहे. या नवीन कॅम्पेनमध्ये या पेस्टची खासियत उलगडून दाखवली आहे. ही पेस्ट किती काळजीपूर्वक तयार केली जाते, तिचा नैसर्गिक सुगंध किती समृद्ध आहे आणि ती रोजच्या स्वयंपाकाला खरा, पारंपरिक स्वाद कसा देते हे या कॅम्पेनमध्ये अधोरेखित केले आहे. प्रत्येक पॅकमध्ये फक्त आले आणि लसूण असते. कोणतेही कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्स यात घातलेले नाहीत. पेस्ट तयार करण्याची पद्धतही अशी ठेवलेली आहे की ताजेपणा, स्वाद आणि टेक्स्चर कायम राहते. सोडियम बेंझोएट न वापरणारा या श्रेणीमधील एकमेव ब्रँड म्हणून मदर्स रेसिपीची ओळख वेगळी ठरते. कॅम्पेनमध्ये ही बाब स्पष्टपणे मांडण्यात आली आहे.

कॅम्पेनबद्दल बोलताना मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालक संजना देसाई म्हणाल्या, “जेव्हा एखादी गोष्ट योग्य असते तेव्हा ते आईला नक्की कळतं. तिला खऱ्याची असलेली जाण आणि काळजी अतुलनीय आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून या जाणीवेची आम्हाला दखल घ्यायची होती. काय अस्सल आहे, हे आई किती चटकन ओळखू शकते, हे आम्हाला दाखवायचे होते. आमची आले-लसूण पेस्ट त्याच खरेपणाने तयार केलेली आहे. कोणताही शॉर्टकट घेतलेला नाही, प्रिझर्व्हेटिव्ह्ज घातलेले नाहीत आणि कोणतीही तडजोड केलेली नाही. फक्त आले व लसूण घालून पेस्ट तयार केली आहे, अगदी आई आपल्या स्वयंपाकघरात करते, तशीच.

कॅम्पेनमध्ये भावना आणि प्रामाणिकपणाची सांगड घालण्यात आली आहे आणि हे कॅम्पेन विविध माध्यमांमधून पोहचविण्यात येत आहे. सोनीलिव्ह, जियोस्टार आणि झी5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सपासून मायगेट आणि लिफ्ट ब्रँडिंगपर्यंत, बसशेल्टर्स आणि बसच्या मागील भागावरील आउटडोअर व्हिजिबिलिटी, इन-स्टोअर ब्रँडिंग, डीलर बोर्ड्स आणि इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन्स यांचा समावेश आहे. सोशल मीडिया मार्केटिंगही या कॅम्पेनचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर व्यापक प्रमाणावर हे कॅम्पेन दिसेल आणि ग्राहकांशी अधिक वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्यात येणार आहे. कॅम्पेनमधील फिल्म आणि क्रिएटिव्ह्समध्ये घरातील आईची उपस्थिती दर्शवणारे छोटे पण प्रभावी क्षण टिपले आहेत. शांतपणे निरीक्षण करणारी आई, तिचा न बदलणारा आत्मविश्वास आणि खरी वस्तू व बनावट वस्तूमध्ये काय फरक आहे हे लगेच ओळखण्याची तिची क्षमता यांचे सुंदर चित्रण यात करण्यात आले आहे.

आजच्या काळात ग्राहक स्वयंपाकात काय वापरतात याबाबत अधिक सजग झाले आहेत. अशा वेळी मदर्स रेसिपीने शुद्धतेचा आणि विश्वासाचा दिलेला शब्द कायम ठेवला आहे. या ब्रँडची भूमिका नेहमीच नैसर्गिक घटकांच्या गुणांवर केंद्रित राहिली आहे, जेणेकरून प्रत्येक उत्पादनात घरच्या जेवणासारखा आपलेपणा आणि प्रामाणिकपणा जाणवावा. हाच स्पष्ट हेतू आणि खऱ्या अर्थाने असलेली प्रामाणिकता यामुळे मदर्स रेसिपीला भारतीय स्वयंपाकघरात पक्के स्थान प्राप्त झाले आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून ब्रँडने आईच्या दैनंदिन हुशारीशी असलेले आपले नाते अधिक घट्ट केले आहे. चांगल्या जेवणाचा पाया प्रामाणिकपणातच असतो यावर आईचा नेहमी विश्वास असतो आणि तिच भावना या कॅम्पेनमधून व्यक्त करण्यात आली आहे. जीवनात अनेक गोष्टी बदलतात, पण आईचे सत्य कधीच बदलत नाही याची हे कॅम्पेन ग्राहकांना पुन्हा एकदा आठवण करून दे

ते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments