Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedतनूरा स्वेथा मेनन आणि सुनील शेट्टी यांनी सुरू केली ‘AgeWell’ — 40...

तनूरा स्वेथा मेनन आणि सुनील शेट्टी यांनी सुरू केली ‘AgeWell’ — 40 वर्षांवरील प्रौढांसाठी भारतातील पहिली संपूर्ण एकीकृत वेलनेस इकोसिस्टम

मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: सिरीअल उद्योजिका तनूरा स्वेथा मेनन यांनी वेलनेस आयकॉन आणि फिटनेस चॅम्पियन सुनील शेट्टी यांच्या सोबत AgeWell च्या सुरुवातीची घोषणा केली आहे. 40 वर्षांवरील प्रौढांसाठी खास बनवण्यात आलेली ही भारतातील पहिली संपूर्ण वेलनेस इकोसिस्टम असून यात अँटी-एजिंग उत्पादने, हेल्दी एजींग सोल्यूशन्स आणि लॉन्जेव्हिटी (दीर्घायुष्य) केंद्रित कम्युनिटी प्लॅटफॉर्म्सना एकत्र आणण्यात येत आहे. AgeWell हे फक्त उत्पादनांचे लॉन्च नाही, तर सह-संस्थापक तनूरा स्वेथा मेनन, मितलाज आणि शाहिन फर्झीन यांच्या आयुष्याच्या अनुभवांवर आधारित राष्ट्रीय आरोग्य चळवळीची सुरुवात आहे. त्यांनी भारतीय ज्येष्ठांच्या विशेष गरजा, हुकलेल्या संधी आणि उणीवा यांचा जवळून अनुभव घेतला असून प्रत्येक कुटुंबासाठी एकीकृत इकोसिस्टम उभारली आहे.

दृष्टिकोन (व्हिजन)

विज्ञानावर-आधारित न्यूट्रास्युटिकल्स, डिजिटल वेलनेस कम्युनिटी प्लॅटफॉर्म्स, प्रतिबंधक आरोग्य उपाय आणि वरिष्ठ नागरिकांसाठी खास तयार केलेल्या लिव्हिंग स्पेसेस या सर्वांच्या एकीकृत दृष्टीकोनाच्या माध्यमातून ‘AgeWell’चा उद्देश वृद्धत्वाकडे ‘घट’ म्हणून नव्हे, तर ‘साजरा करण्यासारखा टप्पा’ म्हणून पाहण्याचा आहे.

संस्थापिका

तनूरा स्वेथा मेनन या भारतातील नामांकित बिझनेस लीडर आणि सिरीअल उद्योजिका आहेत. त्यांनी Herbs & Hugs (भारतभरात 100+ किऑस्क्स आणि 11 SKUs असलेला आयुर्वेदिक पर्सनल केअर ब्रँड; आणि पुरुषांसाठीचा 10 SKUs असलेला आयुर्वेदिक पर्सनल केअरमधील खास उप-ब्रँड Bhishma) आणि Zoul & Zera (भारत, दुबई, ओमान, मालदीव आणि मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय उपस्थिती असलेला 0-6 वर्षांच्या लहान मुलांसाठीचा फॅशन ब्रँड) अशा अनेक यशस्वी ब्रँड्सची उभारणी केली आहे.

क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून एमबीए आणि जवळपास 36 देशांतील सोलो ट्रॅव्हलमधून मिळवलेल्या अनुभवांसह त्यांनी जागतिक वेलनेसचे ज्ञान भारतीय ‘हेल्दी एजींग’कडे आणले आहे. त्यांच्या आत्मकथनपर पुस्तक “थट्टमिट्टा मेनोथी” मधून त्यांच्या व्यवसाय उभारणीपासून ते वैयक्तिक परिवर्तनापर्यंतचा प्रवास मांडला गेला आहे.

“जेव्हा मी चाळीस वर्षांची झाले तेव्हा ते मला संकटासारखे वाटले नाही—त्याने मला आरसा दाखवला. मी दुर्लक्ष केलेला थकवा, नजरेआड झालेले हार्मोनल बदल, आणि कधीही लक्ष न दिलेल्या वेलनेसमधील उणिवा—मला सगळे काही स्पष्ट दिसू लागले. माझ्या स्वतःच्या आरोग्याचा शोध घेत असताना माझ्या असे लक्षात आले की लाखो भारतीय वयाशी संबंधित हेच शांत संघर्ष करत आहेत. ‘AgeWell’ हे त्यावरील माझे उत्तर आहे: ही एक अशी चळवळ जी ताकद साजरी करते, बदलांना साथ देते आणि प्रतिबंध, समुदाय आणि स्पष्टपणा या गोष्टींना आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्या सर्वांत मोठ्या साधनांमध्ये बदलते,” असे ‘AgeWell’च्या संस्थापिका तनूरा स्वेथा मेनन म्हणाल्या.

ब्रँड अॅम्बेसेडर

बॉलिवूडचे वेलनेस पायोनिअर, फिटनेस आयकॉन आणि अनेक वेलनेस स्टार्टअप्सचे मेंटर सुनील शेट्टी हे संपूर्ण आरोग्य आणि सक्रिय एजिंगमधील चार दशकांचे विशेषत्व आपल्यासोबत आणतात. चित्रपट अभिनेता आणि उद्योजक म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीपलीकडे, ते हे दाखवून देतात की शिस्त, सातत्य आणि उद्देशपूर्ण जीवनशैली हीच ‘हेल्दी एजींग’ची खरी ओळख आहे.

AgeWellचे ब्रँड अॅम्बेसेडर आणि मेंटर सुनील शेट्टी म्हणाले, “मी हे नेहमीच मानत आलो आहे की ‘एजिंग वेल’ म्हणजे ‘लिव्हिंग वेल’—उद्देशपूर्ण, मजबूत आणि आनंदी जीवन जगणे. ‘AgeWell’च्या माध्यमातून, चाळीस वर्षांवरील प्रत्येक भारतीय वेलनेसचा हा प्रवास स्वतःसाठी सुरू करू शकतो. या भागीदारीबद्दल मला सर्वांत जास्त आनंद यासाठी आहे की आम्ही केवळ उत्पादने देत नाही आहोत — आम्ही एक आरोग्य आणि वेलनेस चळवळ निर्माण करत आहोत, जी आपल्या समृद्ध आयुर्वेदिक परंपरेला आधुनिक विज्ञानाशी जोडते आणि लोकांच्या खऱ्या आयुष्याला साजेशा अशा वेलनेस दिनचर्या तयार करत आहोत.

AgeWellबद्दल मला खरी भावलेली गोष्ट ती म्हणजे त्याचे संस्थापक. जेव्हा मी तनूरा आणि तिचा मुलगा शाहिन यांना भेटलो — एक 20 वर्षांचा तरुण, ज्याने आपल्या आईचा चाळिशीपलीकडचा प्रवास जवळून पाहिला आणि तिच्यासाठी, तसेच तिच्यासारख्या लाखो लोकांसाठी काहीतरी अर्थपूर्ण घडवण्याचा निर्णय घेतला—तेव्हा मला समजले की हे नक्कीच काहीतरी वेगळे आहे.

आई-मुलामधील ते नाते, तो समजूतदारपणा—पिढ्यांमधील या जोडणीचीच आज भारताला सर्वांत जास्त आवश्यकता आहे.

वेलनेस माझ्या आयुष्यातील एक सातत्यपूर्ण महत्त्वाचा भाग आहे. आणि या टप्प्यावर मी लोकांना हे दाखवू इच्छितो एजिंगचे मॅजिक म्हणजे स्वतःला सतत महत्त्वपूर्ण, ऊर्जा-पूर्ण आणि जोडलेले ठेवणे. ‘AgeWell’ माझ्या मूल्यांशी पूर्णपणे जुळते: स्वतःला वंचित न ठेवता शिस्त राखणे, परंपरा आणि अभिनवता यांचा संगम, आणि ही ठाम श्रद्धा की आपली चाळीशी, पन्नाशी, साठी आणि त्यापुढील प्रत्येक पायरी ही ताकदीची असते, उतरत्या वयाची नाही. ज्यांनी वयाला आपली मर्यादा ठरवू दिलेली नाही, अशा प्रत्येक भारतीयासाठी आत्मविश्वासाने, जोडलेपणाने जगण्याचा संदेश देण्याचा मला अभिमान आहे.”

इकोसिस्टम

वेलनेस उत्पादने: सौंदर्य, ऊर्जा, हार्मोनल संतुलन, जीवनशैली आरोग्य आणि रक्तशर्करेच्या नियंत्रणास मदत करणारी 25 आयुर्वेद–विज्ञान यांचे मिश्रण असलेली हायब्रीड न्यूट्रास्युटिकल्स, अँटी-एजिंग सप्लिमेंट्स आणि हेल्दी एजींग उत्पादने. यामध्ये खालील हिरो प्रोडक्ट्सचा समावेश आहे:

– AgeWell DAWN — भारतातील पहिले रक्तशाली लाल तांदळाचे फ्लेक्स असलेले रेडी-टू-ईट ब्रेकफास्ट सीरियल

– Harmoni — नैसर्गिक वजन व्यवस्थापन आणि स्लिमिंग कॅप्सूल

– Aura, Tandem, Eterna, Torq आणि Sugarcalm — लक्ष्यित वेलनेस आणि दीर्घायुष्य उपाययोजना (टार्गेटेड हेल्दी एजींग सोल्यूशन्स)

AgeWell Connect:

उत्पादनांपलीकडे जाऊन, AgeWellने 40 वर्षांवरील प्रौढांसाठी खास तयार केलेली भारतातील पहिली ड्युअल-प्लॅटफॉर्म डिजिटल इकोसिस्टम सादर केली आहे. AgeWell Connect ही एक खासगी, वापरण्यास सहज अशी सोशल स्पेस तयार करते, जिथे मेंबर्सना सामुदायिक गट, टेलिहेल्थ सल्लामसलत, तज्ज्ञांचे सेशन्स, सांस्कृतिक कंटेंट आणि एक्सक्लुसिव्ह रिवॉर्ड्स मिळतात. यामध्ये 40+ वयोगटासाठी अनुकूल नेव्हिगेशन आणि एकीकृत IoT डिव्हाइस कनेक्टिव्हिटीही दिली आहे. त्याचबरोबर AgeWell Health Tracker हे संपूर्ण आरोग्य मॉनिटरिंगसाठीचे एक पूरक साधन आहे आणि ते हृदयगती, नाडी, ऑक्सिजन सॅच्युरेशन, झोपेची गुणवत्ता, आणि दैनंदिन अॅक्टिविटी लेव्हल्स यांचे ट्रॅकिंग करते, तसेच बुद्धिमान औषध-रीमाइंडर्स, हायड्रेशन अलर्ट्स, आणि GPS लोकेशन शेअरिंगसह एकाच टचमध्ये इमर्जन्सी सहाय्यता देखील प्रदान करते. ही दोन्ही प्लॅटफॉर्म्स एकमेकांमध्ये अखंडितपणे जोडलेली असून, समग्र वेलनेस इनसाइट्स देतात. लवकरच यात सतत मॉनिटरिंग करणारे विशेष वेअरेबल डिव्हाइस जोडले जाणार आहे. यामुळे वैयक्तिक वेलनेस प्रवास हा केवळ वैयक्तिक न राहता तो रिअल-टाईम हेल्थ इंटेलिजन्सने समर्थित, एकत्रित आणि साजरा केलेला अनुभव बनतो.

AgeWell Living Residences: या भारताच्या पहिल्या लॉन्जेव्हिटी लिव्हिंग कम्युनिटीज आणि सीनियर लिव्हिंग रेसिडेन्सेस—रिसॉर्ट-स्तरीय वेलनेस स्पेसेस असून येथे ज्येष्ठांना स्वतंत्रपणे राहण्याची सुविधा मिळते. येथे त्यांना 24×7 क्लिनिकल अॅक्सेस, फिटनेस प्रोग्राम्स, समग्र आरोग्य सेवा आणि सामाजिक इकोसिस्टम उपलब्ध आहे.

 

 

बाजारपेठेतील संधी

भारतातील 40 वर्षांवरील लोकसंख्या आणि सीनियर वेलनेस बाजारपेठेला सध्या विखुरलेल्या आरोग्यसेवा, कमी ग्राहक विश्वास आणि जीवनशैलीवर-आधारित प्रतिबंधात्मक आरोग्याच्या अभावासारख्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. AgeWell ही सर्व आव्हाने एकत्रितपणे हाताळत एकीकृत आणि विश्वासार्ह वेलनेस फ्रेमवर्कद्वारे हेल्दी एजींग आणि लॉन्जेव्हिटीला पाठबळ देत आहे.

लॉन्च धोरण

AgeWellची सुरुवात कोची, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि मालदीव येथे फ्लॅगशिप वेलनेस एक्स्पीरियन्स स्टुडिओजसह 30 प्रीमियम पार्टनर टचपॉइंट्स आणि Amazon, Flipkart आणि Qcom सारख्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील उपस्थितीसोबत करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षाच्या ध्येयामध्ये देशभरात 10–12 फ्लॅगशिप स्टुडिओज आणि 100+ पार्टनर लोकेशन्स उभारणे यांचा समावेश आहे.

संसद सदस्य हिबी इडन यांनी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील अथानी येथे AgeWellच्या कॉर्पोरेट मुख्यालयाचे उद्घाटन केले.

सहसंस्थापकांचे मत

“आम्ही फक्त एक वेलनेस ब्रँड लॉन्च करत नसून चाळीस वर्षांवरील भारतातील लाखो लोकांसाठी एका आत्मविश्वासपूर्ण नव्या युगाची सुरुवात करत आहोत,” असे AgeWellचे सहसंस्थापक मितलाज यांनी सांगितले.

“माझी आईला तिच्या चाळिशीचा टप्पा पार करत असल्याचे पाहताना मला हे जाणवले की आपण आपल्याला लहानाचे मोठ्या करणाऱ्या पिढीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. AgeWell हे माझे वेगळे काहीतरी उभारण्याचे वचन आहे—जिथे वृद्धत्वाला शेवटी त्याच्या योग्य अशा ‘फायद्याच्या टप्प्या’सारखे स्थान दिले जाईल,” असे सहसंस्थापक शाहिन फर्झीन यांनी सांगितले.

अनुपालन

AgeWellची सर्व आरोग्य उत्पादने FSSAI आणि AYUSH च्या नियमांनुसार प्रमाणित आहेत. उत्पादनांसाठी स्थायी स्रोतांचा वापर, पुनर्वापरयोग्य पॅकेजिंग आणि पूर्णपणे पारदर्शक लेबलिंग मानकांचे पालन केले जाते.

 

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या: www.agewellglobal.in

 

AgeWell विषयी माहिती

AgeWell ही भारतातील 40 वर्षांवरील प्रौढांसाठी तयार केलेली पहिली एकीकृत वेलनेस इकोसिस्टम आहे. यात विज्ञानाचा पाठिंबा असलेली प्रीमियम अँटी-एजिंग उत्पादने, ऑनलाइन वेलनेस कम्युनिटी कनेक्शन आणि भविष्यकालीन सीनियर लिव्हिंग स्पेसेस यांचा समावेश आहे. तनूरा स्वेथा मेनन, शाहिन फर्झीन आणि मितलाज यांनी प्रस्थापित केलेल्या, तसेच सुनील शेट्टी यांच्या पाठिंब्याने पुढे नेल्या जाणारी AgeWell ही आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम करून वृद्धत्वाला

ताकद आणि ऊर्जा असलेला टप्पा बनवते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments