Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedकंतारच्या भारतातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्स २०२५ मध्ये एचडीएफसी बँक ठरली १ल्या क्रमांकाची...

कंतारच्या भारतातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्स २०२५ मध्ये एचडीएफसी बँक ठरली १ल्या क्रमांकाची संस्था

वार्ष‍िक तुलनेत ब्रॅन्ड मुल्यांत १८ टक्क्यांची वाढ होऊन ४४.९ बियिलयन डॉलर्स वर पोहोचले

 

 

 

मुंबई, 28 नोव्हेंबर २०२५- एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेला देशातील सर्वाध‍िक मुल्यवान ब्रॅन्ड म्हणून कंतार ब्रॅन्डझ टॉप १०० मोस्ट व्हॅल्युएबल इंड‍ियन ब्रॅन्ड्स रिपोर्ट मध्ये मानांकन प्राप्त झाले आहे. हे मुल्यांकन बँकेच्या डिजिटल नाविन्य आण‍ि ग्राहकाभ‍िमुख अशा योजनां व‍िषयीच्या वचनबध्दते मुळे प्राप्त झाले आहे.

 

 

 

एचडीएफसी बँकेची ब्रॅन्ड व्हॅल्यू ही २०२४ मध्ये ३८.३ बिलियन डॉलर्स होती ती १८ टक्क्यांनी वाढून ४४.९ बिल‍ियन डॉलर्सवर पोहोचली आहे. २०१४ मध्ये पह‍िल्यांदा प्रकाश‍ित करण्यात आलेल्या ब्रॅन्ड्स इंड‍िया रिपोर्ट च्या तुलनेत ३७७ टक्के इतकी आहे. बँकेला हे पह‍िल्या क्रमांकाचे मुल्यांकन १२ वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या रिपोर्ट्स पैकी ८ वेळा मिळाले आहे.

 

कंतारच्या संपादकीय लेखात ते नमूद करतात “एचडीएफसी बँकेची वाढ ही सातत्यपूर्ण नाविन्य आण‍ि नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करुन ग्राहकांचा अनुभव समृध्द केल्याने झाली असून यामध्ये व्ह‍िज‍िल आंटी सारख्या सुपर हिरो स्टाईल व्यक्तीमत्वाचा समावेश आहे, ही व्यक्ती वापरकर्त्यांना वित्तीय फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी प्रश‍िक्ष‍ित करते. डिजिटल बँकिंग ला वाहून घेतल्यामुळे एचडीएफसी बँक सातत्याने भारतातील ब्रॅन्ड लीडरश‍िप साठी नवनवीन उच्च स्तर निर्माण करते.”

 

या रँकिंग विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (ब्रॅन्ड,रिटेल मार्केटिंग ॲन्ड कस्टमर ॲनेलिटिक्स) आण‍ि चीफ मार्केटिंग ऑफ‍िसर श्री रवी संथानम यांनी सांगितले “देशातील सर्वोत्कृष्ट ब्रॅन्ड म्हणून मान्यता मिळाल्या बद्दल आम्ही खूपच आनंदी आहोत. आमच्यासाठी आमच्या तत्वांशी खरे राहणे, ग्राहकांच्या समस्या सोडवणे आण‍ि ग्राहकांचा अनुभव समृध्द करुन सुरक्ष‍ा आण‍ि विश्वसनीयता निर्माण करणे हा आमचा मंत्र आहे. गेल्या तीन दशकांहून अध‍िक काळापासून आम्ही ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन त्या सातत्याने बदलणार्‍या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यावर मार्गक्रमण केले आहे. आमच्या मोहिमासुध्दा ग्राहकांमध्ये सुरक्ष‍ित बँकिंग पध्दतींचा प्रसार आण‍ि जागरुकता यां विषयी तयार केल्या आहेत. या मान्यतेतून बँकेच्या कर्मचार्‍यांचे कष्ट अधोरेख‍ित होतात.”

 

 

 

कंतार ब्रॅन्डझ तर्फे ग्राहकाभ‍िमुख दृष्ट‍िकोनासह आर्थ‍िक मुल्य (ब्रॅन्डच्या मालमत्तेला जोडलेले कॉर्पोरेट उत्पन्न) आण‍ि ब्रॅन्डचे योगदान (मागणीची शक्ती, किंमतीची शक्ती आण‍ि भविष्यातील शक्ती यांचे योगदान) यांचा वापर केला जातो.

 

 

 

बँके विषयी माहिती देतांना रिपोर्ट मध्ये हे नमूद करतो “एचडीएफसी बँकेने ग्राहकाभ‍िमुख नाविन्यांचा वापर करुन आपले ब्रॅन्ड मुल्य वाढवले आहे. अगदी पेमेंट्स पासून ते पर्सनल बँकिंग ते घर खरेदी पर्यंत, एचडीएफसी बँकेने जीवनातील पैशां विषयीची कामे ही अगदी सोपी करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले आहेत. यातील अनेक नाव‍िन्ये ही सही आण‍ि ब्रॅन्ड मालमत्तांशी संबंध‍ित आहेत. उदाहरणार्थ बँकिंग करस्पॉन्डट सेंटर्स आण‍ि ई मित्र किऑस्क्स मुळे एचडीएफसी बँकेची सेवा ही ग्रामीण आण‍ि निमशहरी भागात तयार झाली आहेत. जिथे परंपरागत शाखा नसतात.”

 

 

 

“त्यांच्या डिजिटल एक्सप्रेस कार लोन सेवे मध्ये बाजारपेठेत प्रथमच ३० मिनिटांच्या गॅरेंटीने काम होते. आण‍ि ऑनलाईन एचडीएफसीच्या व्ह‍िजिलंट आंटी व्यक्तीमत्वामुळे लोकांना सायबर सुरक्षा आण‍ि सर्वोत्कृष्ट प्रक्रियांची माहिती लोकांना मिळून बँकेच्या सुरक्षा वैश‍िष्ट्यांची माहिती मिळते. याचा निष्कर्श म्हणजे सक्षम वाढ आण‍ि योग्य लाभ होऊन भारतातील सर्वोत्कृष्ट डिफरंट फायनान्श‍ियल सर्व्ह‍िसेस ब्रॅन्ड बनणे.” असे रिपोर्ट मध्ये पुढे नमूद करण्यात आले.

 

 

 

हा रिपोर्ट वार्ष‍िक असून संपूर्ण भारतातील ग्राहकांच्या संशोधनातून तयार करण्यात आलेला आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments