Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसकारात्मक विचार चांगले भविष्य घडवतात सुप्रसिद्ध वक्ते, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे...

सकारात्मक विचार चांगले भविष्य घडवतात सुप्रसिद्ध वक्ते, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे – पाटील यांचे विचार

 

 

पुणे, २९ नोव्हें. : “अध्यात्म आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. आपल्या मनाची सामर्थ्यशीलता मनामध्ये होणाऱ्या विचारांनी तयार होते. विचार हे आपल्याला ऊर्जा, प्रेरणा आणि दिशा देणारे असतात. विचारांची स्पष्टता आणि सकारात्मक विचारच चांगले भविष्य घडवतात.” असे विचार सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी केशव वेल्हाळ,  नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, ॲड. रियाज पडवीकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, डॉ.मिलिंद पात्रे यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी  विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते.

केशव वेल्हाळ म्हणाले, “ओम हा सृष्टीचे मूळ असून संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे. ओंकार हे भारतीय तत्वज्ञानाचे सार मानले जाते. ओम कॉन्टम कम्प्युटिंग हा तंत्रज्ञानातील जागतिक शांततेचा मार्ग आहे.”

” डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” सर्वांकडे समदृष्टीने पाहण्याची भूमिका संतांच्या साहित्यामुळे तयार होते. समता, समानता व मानवतेचे वैश्विक स्तरावरील आदर्श प्रतीक म्हणून मानवतातीर्थ भवनाची आज ओळख झाली आहे. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या विश्वशांतीच्या अफाट कार्याची ही ओळख कायम राहील.”

डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, ” आज समाजात सांप्रदायिक सद्भावाची खूप गरज आहे. हिंदू मुस्लिम ऐक्यातून अनेक प्रश्न सुटतील. मानवता हाच मुख्य धागा ठेवून सर्वांनी एकत्र रहावे.”

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ” छत्रपती शिवरायांनी  सर्व जातीधर्माच्या सीमा ओलांडून स्वराज्य निर्माण केले. त्यांची वसुधैव कुटुंबकम् या वैश्विक विचाराला पुरक भूमिका होती. रयतेचे राज्य याच विचारांनी विश्वमानवता साधता येईल.”

पराग खानविलकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंदार लेले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments