Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडित विनायक तोरवी यांच्या गायनाने सूर महती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप

पंडित विनायक तोरवी यांच्या गायनाने सूर महती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप

पुणे, दि. २९ नोव्हेंबर, २०२५: ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या शास्त्रीय गायनाने सूर महती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून स्वारगेट येथील नेहरू स्टेडीयम शेजारील गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव संपन्न होत आहे.

 

आज महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख प्रायोजक, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक सल्लागार चेतन वाकलकर, डॉ हरी सहस्त्रबुद्धे, सूर महती फाऊंडेशनचे रवींद्र व मानसी खांडेकर आणि अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर आदी उपस्थित होते. महोत्सवासाठी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एसबीआय, विलास जावडेकर डेव्हलपर्स, सुमा, एल आय सी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.

 

डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि देशातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक होत्या अशा शब्दांत ज्येष्ठ गायक पंडित विनायक तोरवी यांनी त्यांची आठवण काढली. आजच्या पहिल्या दिवसाच्या दुसरा सत्राचा समारोप पंडित विनायक तोरवी यांच्या कसदार गायनाने झाला. त्यांनी या वेळी राग छायानटची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘अब गुंद लाओ रे माननियां…’ ही पारंपरिक रचना सादर केली. यानंतर त्यांनी ‘पल पल सोच विचार करुं मैं…’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी ‘घर जाने दे अब मोरे मन बसियां…’ ही रचना प्रस्तुत केली. ‘चिदंबर राया ब्रह्माण्ड नायका…’ आणि ‘देव माझा, मी देवाचा…’ या अभंगांच्या सादरीकरणाने त्यांनी गायनाचा समारोप केला. पंडित विनायक तोरवी यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), दत्तात्रय वेलणकर, धनंजय हेगडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. स्वानंद पटवर्धन यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

 

उद्या रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सायं ४.३० वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर पं. बिरजू महाराज यांचे शिष्य असलेले प्रसिद्ध नर्तक, संरचनाकार देवेश मिरचंदानी यांच्या कथक नृत्याची प्रस्तुती होईल. गुरु पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचे वर्षानिमित्त त्यांना वंदन करणारा, सूर महती फाउंडेशन निर्मित ‘पारिजात फुलला’ हा लघुपट यानंतर प्रदर्शित करून त्याचे लोकार्पण संपन्न होईल. तर ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने सूर महती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप

होईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments