Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमरावतीकरांकडुन शहर पक्षी " तांबट पक्षी" निवड

अमरावतीकरांकडुन शहर पक्षी ” तांबट पक्षी” निवड

( प्र.सु. हिरुरकर यांजकडून)

अमरावती दि. ३ डिसेंबर,अमरावती तांबटमय – ‘शहर पक्षी’ म्हणून ‘तांबट’ पक्ष्याची निवड अमरावतीकरांनी केली आणि अख्खी अमरावती तांबटमय झाली. शहरातील झाडाझाडांवरुन टुक् .. टुक् .. आवाज चोहीकडे पसरु लागला. निसर्गावर प्रेम करणारेही आनंदित झाले. निसर्गाने तांबटावर नानाविध रंगांची जी मुक्त हस्ताने उधळण केली ती कोणालाही तांबटाच्या प्रेमात पाडल्या शिवाय राहातं नाही. मात्र तांबट पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही आता अमरावतीकरांवर आहे. तसे या शहराचे सुजाण नागरिकांची निसर्ग आणि पशु पक्ष्यांवर प्रेम करण्याची ख्याती आहेच. नुसता तांबटच नव्हेतर यानिमित्ताने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सहाही पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन अमरावती करांनी करणे गरजेचे आहे. त्यात आपले शहर कुठेही कमी पडणार नाही, अशी अपेक्षा नव्हे खात्री आहे. डॉ जयंत वडतकर, त्यांचे सहकारी आणि अमरावती महानगरपालिका यांचे मनापासून आभार. अभिनंदन . मागिल महिन्यात अमरावतीत ३ रे अखिल भारतीय आणि ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अत्यंत यशस्वीपण पार पडले आणि आता शहर पक्षी ही आगळीवेगळी निवडणूकही यशस्वीपणे पार पडली त्या निमित्त सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद. यानिमित्ताने शहराच्या प्रवेशव्दारांवर अमरावतीचा शहर पक्षी ‘तांबट’ आणि तांबटाचे सुंदर छायाचित्र पोस्टर तयार करून लावल्यास शहराची वेगळी ओळख निर्माण होईल. मार्गशीर्षाच्या गुलाबी थंडीत तांबटाची ही निवडणूक अमरावतीकरांना कायम उब देणारी ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments