Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रिसाला - हिरानंदानी टाउनशिपचा नवा विक्रम!

क्रिसाला – हिरानंदानी टाउनशिपचा नवा विक्रम!

पुणे, ३ नोव्हेंबर २०२५ : पुण्याच्या रियल इस्टेट क्षेत्रात उत्तर हिंजवडीतील क्रिसाला–हिरानंदानी टाउनशिपने भारतातील कुठल्याही निवासी प्रकल्पाने आजवर साधले नाही, ते करून एक नवीन विक्रम रचला आहे. पुण्यातील क्रिसाला – हिरानंदानी टाउनशिप या प्रकल्पाच्या भव्य घर वाटप कार्यक्रमात ३,००० हून अधिक कुटुंबांच्या उपस्थितीत टाउनशिपच्या पहिल्या टप्प्यात जवळपास तीन पट जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवली. केवळ एका दिवसात १,१०० पेक्षा जास्त घरांचे बुकिंग झाले. आणि तब्बल रुपये १,००० कोटींचा महसूल निर्माण झाला. हा विक्रम या टाउनशिपला भारतातील सर्वात यशस्वी रियल एस्टेट लॉन्चपैकी एक बनवतो.

 

प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ग्राहकांची उत्सुकता, आनंद आणि आशा अधिक वाढली आहे. यावेळी घर मिळवण्यासाठी आलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. हा प्रतिसाद म्हणजे एकात्मिक, भविष्यवेधी जीवनशैलीसाठी ग्राहकांची असलेली वाढती ओढ दर्शवते. कार्यक्रमादरम्यान ग्राहकांना असलेल्या हिरानंदानी कम्युनिटीजच्या परंपरेवरील विश्वास आणि क्रिसाला डेव्हलपर्सचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन अत्यंत जवळून पाहता आला.

 

पहिल्या टप्प्याच्या अभूतपूर्व यशानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील घर वाटप लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात घर मिळवू न शकलेल्या ग्राहकांसाठी क्रिसाला – हिरानंदानीकडून विशेष लाभ दिले जातील.

 

या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद पाहून हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले,“हा फक्त विक्रम नाही तर हा कुटुंबांनी आणि गुंतवणूकदारांनी क्रिसाला–हिरानंदानीच्या दृष्टीकोनावर ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. या जबरदस्त प्रतिसादामुळे पुणे जागतिक दर्जाच्या, मोठ्या प्रमाणात एकात्मिक टाउनशिपसाठी पूर्णपणे सज्ज आहे हे सिद्ध केले. ही टाउनशिप फक्त उत्तर हिंजवडी नव्हे तर भारताच्या रिअल इस्टेटच्या इतिहासातील एक प्रतिष्ठीत प्रकल्प ठरेल.”

 

या शुभ प्रसंगी क्रिसाला डेव्हलपर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक सागर अग्रवाल म्हणाले, “आम्हाला मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय आणि मनाला स्पर्श करणारा होता. एका दिवसात १,१०० घरांची नोंदणी व रुपये १,००० कोटींचा महसूल मिळवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणे हा केवळ क्रिसालासाठीच नव्हे तर या प्रवासात सामील झालेल्या प्रत्येक ग्राहकासाठी अभिमानाचा क्षण आहे. जे लोक पहिल्या टप्प्यात सामील होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी दुसरा टप्पा लवकरच खुला होणार आहे आणि त्यांचे या प्रकल्पात तेवढ्याच प्रेमाने व सन्मानाने स्वागत केले जाईल.”

 

उत्तर हिंजवडीतील १०५ एकरांवर पसरलेली क्रिसाला–हिरानंदानी टाउनशिप ही पुण्याची पहिली ब्रँडेड रिसॉर्ट-स्टाईल एकात्मिक टाउनशिप आहे. निवासी, व्यावसायिक, आरोग्यसेवा, शिक्षण आणि मनोरंजन यांचा समन्वय साधून ही टाउनशिप भारतातील सर्वात प्रतिष्ठित टाउनशिप ठरेल.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments