Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामदैवत श्री कसबा गणपतीला लोकरीचा पोशाख* ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर...

ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला लोकरीचा पोशाख* ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; लोकरीचे सोवळे, शाल, कानटोपी चा पोशाख 

 

 

पुणे : शिशिर ऋतू मधील संकष्टी चतुर्थी आणि सध्या पुण्यात पसरलेली थंडी या निमित्ताने ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात श्री जयती गजानन स्वयंभू मूर्तीस लोकरीचा पोषाख करण्यात आला होता. खास जयती गजाननासाठी बनवून घेतलेले लोकरीचे सोवळे, लोकरीची शाल तसेच कानटोपी पोषाख केला गेला होता.

 

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने साकारलेल्या लोकरीच्या पोशाखातील रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी झाली होती. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट करण्यात आली.

 

मोरयासमोर प्रातिनिधिक स्वरूपात शेकोटी पेटवली होती. याप्रसंगी खास हिवाळ्यात मिळणाऱ्या मेव्याचे जसे हुरडा, आवळे, बोरं, हरभरा, गाजरे, मटार त्याचप्रमाणे फळे व मिठाई यांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानतर्फे वर्षभरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सर्व सण- उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची देवस्थानाची परंपरा आजही कायम आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments