पुणे, 8 डिसेंबर 2025 : संचेती हॉस्पिटल तर्फे 60व्या वर्षात पदार्पणाची सुरूवात आरोहन 2025 वॉकथॉनने भव्य करण्यात आली. या सर्वसमावेशक वॉकथॉनमध्ये 350 हून अधिक जणांनी भाग घेतला.यामध्ये 147 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला होता. रविवारी पहाटे शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल पासून एआयएसएसएमएस कॉलेजपर्यंत झालेल्या या वॉकथॉनमध्ये डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी, फिटनेस प्रेमी तसेच दिव्यांग लोकांसह शेकडो नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला.या कार्यक्रमाला राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या उपायुक्त नेहा गाधे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.पीसीएमसी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी,आर्मी पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर,खडकीचे ऑफिसर इन्चार्ज कर्नल मुखर्जी (निवृत्त),पीएमसीचे सहाय्यक सामाजिक विकास अधिकारी राजेंद्र मोरे,सप्तर्षी फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक सचिव मनोज बोरसे यांच्यासह संचेती हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ.पराग संचेती, विपणन व संपर्क विभागाच्या संचालिका विभागाच्या रूपल संचेती, अर्चना संचेती,मनिषा संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.
“वॉक फॉर एक्सलन्स” या संकल्पनेवर आधारित या वॉकथॉनचा उद्देश सर्वांगीण आरोग्य जागरूकता, समावेशकता आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा होता. सुमारे एक तासाच्या वॉकथॉन मार्गावर सहभागींच्या उत्साहाने वातावरणात एकत्र चालत धैर्य, समता आणि ऐक्याचा सुंदर संदेश दिला. 147 दिव्यांगांच्या उपस्थितीमुळे हा सर्वांत मोठ्या समावेशक वॉकथॉन्सपैकी एक ठरला.


