Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्याच्या दिव्यांग भाग्यश्री नडीमेटला कन्ना यांचा ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजण श्रेणी’त राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

पुण्याच्या दिव्यांग भाग्यश्री नडीमेटला कन्ना यांचा ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजण श्रेणी’त राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

५०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनविणाऱ्या नडीमेटला यांचा नुकताच दिल्ली येथे करण्यात आला सन्मान

 

पुणे. दि. ९ डिसेंबर, २०२५ : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आणि आजवर ५०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणाऱ्या पुण्याच्या दिव्यांग कला शिक्षिका भाग्यश्री नडीमेटला कन्ना यांचा नुकत्याच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात भाग्यश्री नडीमेटला यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

भाग्यश्री या स्वत: दिव्यांग असून पुण्यातील बधीर- मूक शिक्षण केंद्रात त्या कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कला, पेंटिंग, कुकिंग आणि अनेक विषय शिकवत त्यांचा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन वाढवण्याचे काम केले असून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

 

आर्टस् या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या श्रवण बाधित (मूकबधिर) महिला असून २०२३ मध्ये इंटरनॅशनल एबी-ऑलिम्पिक्स (फ्रान्स) मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रेस मेकिंग प्रकारात भारताकडून सहभागी होणाऱ्या भाग्यश्री या पहिल्या महिला स्पर्धक असून डिसेंबर २०२४ मध्ये गुरुग्राम, हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय अॅबिलिम्पिक्समध्ये ड्रेस मेकिंग श्रेणीत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. या विजयानंतर, २०२७ मध्ये फिनलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅबिलिम्पिक्समध्ये ड्रेस मेकिंगसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आता भाग्यश्री यांची निवड झाली आहे.

 

याबरोबरच युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजचा शिक्षण विभाग आणि युकेच्या कॅन्डर (CaNDER) नेटवर्कच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दिव्यांग शिक्षकांना सक्षम करण्याविषयक जागतिक उपक्रमातही भाग्यश्री यांनी योगदान दिले आहे. भाग्यश्री यांच्या या सर्व कला व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना सर्वोश्रेष्ठ दिव्यांजन श्रेणीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कार मिळा

ला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments