Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिंद्रातर्फे रस्ते बांधकाम उद्योगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवीन मिनी कॉमपॅक्टर ‘कॉमपॅक्स’ चे अनावरण

महिंद्रातर्फे रस्ते बांधकाम उद्योगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवीन मिनी कॉमपॅक्टर ‘कॉमपॅक्स’ चे अनावरण

09 डिसेंबर 2025: महिंद्राज् कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट बिझनेस (MCE) ने आज बंगळुरू येथील BIEC मध्ये CII आयोजित EXCON प्रदर्शनात रोड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी आपल्या नवीन महिंद्रा COMPAX या मिनी कॉमपॅक्टरचे अनावरण केले. MCE ने यासोबतच ग्राहकांना अधिक उत्पन्न आणि समृद्धी मिळवून देत आपल्या प्रगत CEV-V श्रेणीमधील आधुनिक प्रगत वैशिष्ट्ये, अधिक आराम, जास्त उत्पादकता आणि कामगिरी सादर करणाऱ्या आणि नवीन मापदंड प्रस्थापित करण्यास सज्ज अशा मशिन्सचेही प्रदर्शन केले.

 

या प्रसंगी बोलताना महिंद्रा ट्रक, बस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचे व्यवसाय प्रमुख तसेच महिंद्रा ग्रुपच्या SML महिंद्रा लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ डॉ. वेंकट श्रीनिवास म्हणाले, “महिंद्राची व्यावसायिक वाहने आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मशिन्स (बांधकाम साधनयंत्रे) त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, मजबूत बांधणी आणि विश्वसनीयतेसाठी ओळखली जातात. त्यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक उत्पन्न आणि नफा मिळण्यास मदत होते. नवीन Mahindra COMPAX मध्येही हाच महिंद्रा डीएनए आहे आणि ते आमच्या ग्राहकांना जास्त नफा व समृद्धी देण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय पायाभूत सुविधा परिसंस्थेतील आव्हानांचे आमचे सखोल ज्ञान आणि स्वदेशी उत्पादनाच्या मजबूत क्षमतांमुळे आमची सर्व मशिन्स, तसेच हा नवीन मिनी कॉमपॅक्टर कठीण कम्पॅक्शन कामांसाठी आदर्श निवड ठरतात.”

 

महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायात लोकप्रिय महिंद्रा रोडमास्टर मोटर ग्रेडरचा समावेश आहे. तो परवडणाऱ्या किमतीत अधिक शक्ती आणि कामगिरी सादर करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. त्यामुळे रस्ते बांधकाम प्रकल्पांना गती मिळते. त्यामुळे आपल्या श्रेणीत 18% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह हा मोटर ग्रेडर बाजारपेठेत अग्रणी आहे. याचबरोबर महिंद्रा अर्थ मास्टर बॅकहो लोडर अधिक टॉर्क, असंख्य नवीन वैशिष्ट्ये आणि सर्वाधिक इंधन क्षमता यांसह येतो. त्यामुळे ऑपरेटर्सची उत्पादकता आणि उत्पन्न वाढते.

 

MCE Machines च्या श्रेणीला सतत वाढणाऱ्या विस्तृत सेवा आणि स्पेअर्स नेटवर्कचा मजबूत आधार आहे. त्यात 136 पेक्षा अधिक टचपॉइंट्स आहेत. 51 + 3S डीलरशिप्स, 16 साथी+ अधिकृत सर्व्हिस सेंटर्स, 19 हून अधिक साथी+ सेल्स आउटलेट्स आणि 50 हून अधिक सुटे भाग आउटलेट्स यांचा समावेश

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments