Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्राफ्टन इंडियाकडून पुण्यातील नॉटिलस मोबाईलच्या रिअल क्रिकेटच्या प्रकाशन हक्कांचा ताबा, मेक-इन-इंडिया गेमिंग...

क्राफ्टन इंडियाकडून पुण्यातील नॉटिलस मोबाईलच्या रिअल क्रिकेटच्या प्रकाशन हक्कांचा ताबा, मेक-इन-इंडिया गेमिंग व्हिजनचे सक्षमीकरण

 

 

 

 

• मार्च २०२५ मध्ये क्राफ्टनने पुणेस्थित नॉटिलस मोबाइल स्टुडिओमध्ये सर्वाधिक समभाग खरेदी केला. त्यामुळे भारताच्या गेमिंग क्षेत्रात गुंतवणुकीचा विस्तार झाला

• हा समावेश क्राफ्टनचे प्रकाशन नेतृत्व आणि नॉटिलसचे विकास ज्ञान यांच्यामुळे दीर्घकालीन मार्गक्रमणाचा पहिला टप्पा ठरला आहे

• वैशिष्ट्यांमध्ये अधिकृत आयपीएल टीम परवाने, दृश्य सुधारणा, सुधारित कॉमेंटरी आणि बॅकएंड सुधारणांचा समावेश आहे

बेंगळुरू, ९ डिसेंबर २०२५: क्राफ्टन इंडिया उद्या लाइव्ह होणाऱ्या अपडेटसह नॉटिलस मोबाइलने विकसित केलेल्या देशातील आघाडीच्या क्रिकेट गेमिंग फ्रँचायझी, रिअल क्रिकेटसाठी अधिकृतपणे प्रकाशन जबाबदारी स्वीकारणार असून एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. हे पाऊल भारतातील गेमिंग वातावरण मजबूत करण्यासाठी आणि जागतिक क्षमतेसह स्वदेशी गेमिंग आयपींना पाठबळ देण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

रिअल क्रिकेट ही दीर्घकाळापासून भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रिय मोबाइल गेमिंग फ्रँचायझींपैकी एक आहे. त्यात लाखो खेळाडूंना एकत्र येतात आणि क्रिकेट सिम्युलेशनमध्ये नवीन मानके स्थापित करतात. क्राफ्टनच्या प्रकाशन नेतृत्वाकडून मार्गदर्शित आणि नॉटिलस मोबाइलच्या क्रिकेट गेम डेव्हलपमेंटमधील दशकभराच्या कौशल्याने समर्थित हा सहभाग लाखो खेळाडूंसाठी समृद्ध, अधिक कनेक्टेड आणि अधिक फायदेशीर क्रिकेट अनुभव निर्माण करण्यासाठी सामायिक महत्त्वाकांक्षा दर्शवते. तसेच भारतीय स्टुडिओतील गुंतवणूक, क्राफ्टन इंडिया गेमिंग इनक्यूबेटर (केआयजीआय), जागतिक दर्जाचे ईस्पोर्ट्स इव्हेंट्स आणि स्थानिक प्रतिभेचे संगोपन करण्यास मदत करणारे उपक्रम यासह भारताच्या गेमिंग महत्त्वाकांक्षांना चालना देण्यासाठी क्राफ्टन सातत्यपूर्ण कार्यरत आहे.

मार्च २०२५ मध्ये ११८ कोटी रूपयांत (अंदाजे १४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) नॉटिलस मोबाइलचे अधिग्रहण केल्यामुळे क्राफ्टन आणि नॉटिलस मोबाइलमधील दीर्घकालीन भागीदारीचा टप्पा आणखी मजबूत झाला आहे. या भागीदारीद्वारे क्राफ्टन इंडिया नॉटिलस मोबाइलसोबत काम करेल जेणेकरून रिअल क्रिकेट वाढीच्या पुढील टप्प्यात जाईल, लाइव्ह ऑपरेशन्स मजबूत होतील आणि खेळाडूंना अधिक समृद्ध, अधिक तल्लीन करणारा अनुभव देण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढेल. आपल्या जागतिक प्रकाशन कौशल्याचा फायदा घेत, क्राफ्टन मुख्य गेमप्ले वैशिष्ट्ये आणि इन-गेम सिस्टम वाढविण्यास मदत करेल आणि फ्रँचायझीची पोहोच संपूर्ण भारतभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत आणि निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत वाढवेल.

नवीन आवृत्तीत दोन मुख्य वैशिष्ट्ये असून ती पहिल्या दिवसापासून अनुभव समृद्ध करतात:

• आरसी पास – आव्हाने आणि विशेष अनलॉक देणारी ३०-दिवसांची प्रोग्रेस सिस्टिम

• रिअल रिवॉर्ड्स टी२० मालिका – खेळाडूंना लीडरबोर्ड स्पर्धेद्वारे इन-गेम यशाचे खऱ्या जगातील रिवॉर्ड्समध्ये रूपांतर करण्यास सक्षम करते.

या अपडेट्समध्ये खेळातील अनेक सुधारणांचा समावेश आहे. त्यात राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांचे अधिकृत आयपीएल संघ समाविष्ट आहेत. पुढील काळात आणखी संघ येणार आहेत. खेळाडूंसाठी नवीन हिंदी समालोचन, सुधारित दृश्ये, अद्ययावत अॅनिमेशन आणि मोबाइलवर लाईव्ह स्टेडियमचे वातावरण निर्माण करणारा इंटरफेस असेल.

क्राफ्टन इंडिया इनक्यूबेटर प्रोग्रामचे प्रमुख आणि इंडिया पब्लिशिंग – क्राफ्टन इंडिया गेमिंग इनक्यूबेटरचे सहयोगी संचाल अनुज सहानी म्हणाले, “रिअल क्रिकेट हे भारतातील लाखो लोकांसाठी एक सांस्कृतिक संपर्कबिंदू बनले आहे आणि आम्ही त्याचा पुढील टप्पा देशातील गेमिंग विकासाच्या भविष्यासाठी एक मैलाचा टप्पा म्हणून पाहतो. हा सहयोग आमचा विश्वास प्रतिबिंबित करतो की भारतीय स्टुडिओ जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या जागतिक दर्जाच्या फ्रँचायझी तयार करू शकतात. रिअल क्रिकेट हे अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी, स्वदेशी नवसंशोधनाचे प्रतिनिधित्व करते. त्याला आम्ही यशस्वी बनवू इच्छितो आणि आम्हाला त्याला आणखी व्यापक आणि जागतिक खेळाच्या दिशेने त्याच्या प्रवासाला पाठबळ देताना अभिमान वाटतो. क्राफ्टन प्रकाशन छत्राखाली हा यशस्वी स्वदेशी आयपी आणून आम्ही आमचे मेक-इन-इंडिया स्वप्न दुपटीने यशस्वी करत आहोत आणि देशात एक सळसळती गेमिंग इकोसिस्टम तयार करण्यासाठी आमची दीर्घकालीन वचनबद्धता मजबूत करत आहोत.”

“मागील दशकाहून अधिक काळापासून रिअल क्रिकेट एकाच ध्येयाने कार्यरत आहे – खेळाडूंच्या फोनवर रिअल-वर्ल्ड क्रिकेटचा उत्साह, बारकावे आणि नाट्य आणणे,” असे नॉटिलस मोबाइलचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज मानकर म्हणाले. “या नवीन बाबीसह आम्ही नवीन प्रोग्रेस सिस्टिम, सखोल स्पर्धा आणि आमच्या समाजासाठी अधिक तीक्ष्ण, अधिक पॉलिश्ड अनुभवासह या पायावर बांधकाम करत आहोत. क्राफ्टनकडून सतत मिळालेल्या पाठिंब्याने आमचे दृष्टिकोन मजबूत करण्यात आणि आम्हाला मोठे विचार करण्यासाठी आणि अधिक धाडसी बनण्यासाठी साधनसामुग्री देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, रिअल क्रिकेट काय बनू शकते आणि भारत आणि त्यापलीकडे जाऊन खेळाडूंसाठी आपण कोणत्या नवीन शक्यता उलगडू शकतो याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”

 

एक दिशादर्शक

रिअल क्रिकेटचा आगामी टप्पा नवीन अनुभव, स्पर्धेचा विस्तार आणि खेळाडूंना वर्षभर खेळत ठेवण्यासाठी नवीन मार्ग तयार करेल. संघ व्यापक स्पर्धात्मक स्वरूपे आणि ग्रुप इव्हेंट्सदेखील तयार करत आहे जेणेकरून फ्रँचायझीशी दीर्घकालीन संलग्नता वाढेल आणि रिअल क्रिकेट खेळाच्या सर्वात मोठ्या सीझनसोबत वाढत राहील याची खात्री होईल.

 

अपडेट्स, घोषणा आणि आगामी फीचर ड्रॉप्सबद्दल अधिक माहितीसाठी, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर रिअल क्रिकेटला फॉलो करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments