मुंबई: फेब्रुवारी २७, २०२४: – ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या संपूर्ण श्रेणीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा केली आहे. ग्राहक त्वरित प्रत्येक मॉडेलवर बचतींचा लाभ घेऊ शकतात, जेथे किमती जवळपास १०,००० रूपयांनी* कमी करण्यात आल्या आहेत. या धोरणात्मक पुढाकाराचा इलेक्ट्रिक परिवहनाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सच्या अवलंबतेला गती देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी अधिक लक्षवेधक व किफायतशीर होतील.
सर्वांसाठी पर्यावरणास अनुकूल परिवहन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाशी बांधील राहत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकलने आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या संपूर्ण श्रेणीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे, जी ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध असेल. कमी करण्यात आलेल्या किमती पुढीलप्रमाणे:
मॉडेल
ई२गो लाइट
ई२गो+
ई२गो ग्रॅफिन
व्ही२
व्ही२+
इव्होकिस
पूर्वीची किंमत
७१,१००
८१,४००
६३,६५०
७७,२५०
१,००,४५०
१,७१,२५०
आताची किंमत
६९,९९९
७८,९००
६२,६५०
७६,२५०
९८,४५०
१,६६,०००
ट्रॉट
रेसर लाइट
रेसर प्रो
हॉक लाइट
हॉक+
वेडर
पूर्वीची किंमत
९९,९९९
८५,०००
१,११,५००
९९,४००
१,१७,९५०
१,६१,५७४
आताची किंमत
९४,९९९
७७,५००
१,०१,५००
९६,९००
१,१०,९५०
१,५६,५७४
*वर उल्लेख करण्यात आलेल्या किमती आरटीओ विमा व इतर कोणतेही खर्च वगळून एक्स-शोरूम किमती आहेत.
ओडीसीने बॅटरी खर्चामध्ये कपात झाल्यामुळे किंमत कमी केली आहे आणि हा फायदा ग्राहकांना दिला आहे. किमतीमधील कपातीसह कंपनीचा अधिकाधिक व्यक्तींना इलेक्ट्रिक गतीशीलतेचा अवलंब करण्यास आणि हरित भविष्य घडवण्याप्रती योगदान देण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
याप्रसंगी मत व्यक्त करत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्हणाले, ”आम्हाला किमतीमधील या सर्वसमावेशक कपातीची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्यामधून गतीशीलता क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ही कपात करत आम्ही संभाव्य ग्राहकांना शाश्वततेसह अधिक किफायतशीरपणा प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या इलेक्ट्रिक दुचाकी अधिक किफायतशीर करत आम्ही उपलब्धता वाढवण्यासह हरित व अधिक शाश्वत परिवहन पर्यायांप्रती परिवर्तनाला चालना देखील देत आहोत.”
इलेक्ट्रिक दुचाकीच्या संपूर्ण श्रेणीच्या किमतीमधील ही कपात ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्सचे इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रातील स्थान अधिक दृढ करते. कंपनी नाविन्यता, दर्जा व ग्राहक समाधानाप्रती कटिबद्ध आहे, तसेच हरित व अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचालीमध्ये अग्रस्थानी आहे.
—


