Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedजातीभेदापेक्षा मानवतेचा धर्म मोठा* वास्तुविशारद डॉ. आनंद पिंपळकर यांचे मत ;...

जातीभेदापेक्षा मानवतेचा धर्म मोठा* वास्तुविशारद डॉ. आनंद पिंपळकर यांचे मत ; अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत व भोजन समारंभ

 

 

पुणे : लहान मुलांपेक्षा आपण कधी कधी अधिकच असमंजसपणे वागतो. देश मोठा कसा करायचा यापेक्षा आपण जातीभेदांचे वाद निर्माण करतो. मोठेपणा, मान-सन्मान आणि श्रीमंती यांच्या नादात आपण आपला खरा धर्म विसरत चाललो आहोत. कोणत्याही धर्मापेक्षा मानवतेचा धर्म मोठा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत ज्येष्ठ वास्तुविशारद डॉ. आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले.

 

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तसेच बेघर, अनाथ, एक पालक मुले, मनोरुग्ण व वयोवृद्ध नागरिकांचा सांभाळ करणाऱ्या अहिल्यानगर येथील जनजागृती कला- क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी बाजीराव रस्त्यावरील ट्रस्टच्या कार्यालयात संस्थेतील मुलांसाठी भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले. वेंकिज उद्योग समुहाचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेला २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी जेजुरी देवस्थानचे समन्वयक अॅड. मंगेश जेजुरीकर, पेशवाईज् श्रीमंत कलेक्शन पुणेचे संचालक अमोल येमूल, सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री साळुंके, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, डॉ सुनील ठिगळे,भोला वांजळे आदी उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री साळुंके आणि अॅड. मंगेश जेजुरीकर यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले.

 

निवृत्ती जाधव म्हणाले, ट्रस्टच्यावतीने समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध विधायक उपक्रम राबविले जातात. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत, तसेच पोलीस बांधव असोत किंवा शेतकरी असोत प्रत्येकासाठी काहीतरी उपयुक्त करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या मुलांच्या जीवनात नव्या वर्षाची सुरूवात नवीन आशा घेऊन यावी, अशी सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments