Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वरसाधना ग्रुपच्या संगीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद गायक शौनक भागवत, प्राची पुरंदरे...

स्वरसाधना ग्रुपच्या संगीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद गायक शौनक भागवत, प्राची पुरंदरे यांचे सादरीकरण

पुणे : देवदेवेश्वर संस्थान सारसबाग येथे स्वरसाधना ग्रुपच्या वतीने संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील राग, भजन, अभंग आदी रचना सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात गायक शौनक भागवत यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग कलावती, पुरीयाधनाश्री, तसेच मुरलीधर श्याम आणि कानडा राजा पंढरीचा यांसारखी निवडक रचना सादर केल्या. गायिका प्राची पुरंदरे यांनी राग भिन्न षडज, भैरवी तसेच भजन प्रथम तुला वंदितो आणि वद जाऊ कोणाला शरण गा यांची अप्रतिम प्रस्तुती दिली.

 

 

उर्वशी लेहंगे यांनी लक्ष्मी बारम्मा… हृदयाच्या तालवार नाचे आणि गणेशू या भावपूर्ण रचना सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. वाद्यवृंदात प्रफुल्ल कुलकर्णी (बासरी), विजय कुलकर्णी (हार्मोनियम), वेद पुरोहित (तबला) आणि ध्वनीव्यवस्थापन अक्षय बुटे यांनी उत्तम साथ दिली.

 

 

अनंत गोसावी यांनी बाजे रे मुरलीया बाजे आणि प्रथम तुला वंदितो ही भक्तिगीते सादर केली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments