पुणे, १३ डिसेंबर २०२५ : मुंबई-स्थित अॅग्रिटेक इनोव्हेटर मीरो डिजिटल लॅब्स भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी कृषी ट्रेड फेअर किसान २०२५ मध्ये सहभागी. ही प्रदर्शनी १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केली आहे.
स्टॉल क्रमांक १५१ वर मीरो डिजिटल लॅब्स शेतकरी, एफपीओ, कृषी उद्योजक आणि शेतीशी थेट संबंधित शासकीय संस्थांसाठी विकसित केलेल्या प्रिसिजन अॅग्रीकल्चर तंत्रज्ञानाची संपूर्ण मालिका सादर करणार आहे.
सहभागाबद्दल बोलताना मीरो डिजिटल लॅब्सच्या संस्थापक सुनिती गुप्ता म्हणाल्या,
“मीरोमध्ये आमचे ध्येय नेहमीच स्पष्ट राहिले आहे—शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे आणि त्यांचे उत्पादन अधिक सक्षम बनविणारे तंत्रज्ञान उपलब्ध करणे. किसान २०२५ आम्हाला थेट शेतकरी समुदायाशी संवाद साधण्याची, त्यांची अडचणी समजून घेण्याची आणि डेटा-आधारित अंतर्दृष्टी कशाप्रकारे दैनंदिन निर्णयक्षमतेत परिवर्तन घडवू शकते हे दाखविण्याची उत्कृष्ट संधी देते. प्रिसिजन अॅग्रीकल्चर सर्वांसाठी उपलब्ध, उपयुक्त आणि खऱ्या अर्थाने शेतकरी-केंद्रित असावे—यातच आमच्या या वर्षीच्या प्रदर्शनाचे सार आहे.”
मीरोने विभक्त व विखुरलेल्या साधनांपलीकडे जाणारे एक समाकलित प्रिसिजन अॅग्रीकल्चर प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इमेजिंग, IoT, AI आधारित विश्लेषण आणि फील्ड सपोर्ट यांच्या संयोगातून मीरो प्रत्येक शेतासाठी सतत अद्ययावत राहणारे फार्म हेल्थ कार्ड उपलब्ध करते.
स्टॉल १५१ वर भेट द्या आणि स्मार्ट फार्मिंगचे भविष्य प्रत्यक्ष अनुभवा!
प्रदर्शनातील प्रमुख उत्पादने व सेवा:
• शासकीय मान्यताप्राप्त मृदा परीक्षण प्रयोगशाळा
१४ महत्त्वपूर्ण माती परिमाणांचे ८० – ९०% अचूकतेने विश्लेषण. ब्लूटूथद्वारे कनेक्टिव्हिटी आणि सर्व डेटा सुरक्षित ब्लॉकचेनमध्ये संग्रहित.
• सौरऊर्जेवर चालणारे मृदा आर्द्रता सेन्सर्स
वेळेवर योग्य निर्णयामुळे २५ – ४०% पाण्याची बचत आणि ३०% वीज बचत.
• मल्टीस्पेक्ट्रल ड्रोन इमेजिंग
पीकातील ताण व रोगांचे प्रारंभिक टप्प्यातील निदान — डोळ्यास दिसण्यापूर्वीच. उत्पादन वाढ आणि रासायनिक फवारणीमध्ये कपात.
• Meerolink अॅपद्वारे कृषी सल्ला सेवा
वैयक्तिकृत कृषी सल्ला, शेती नोंदींचे डिजिटायझेशन आणि भविष्यातील AI आधारित सल्ला क्षमता.
• हायपरलोकल हवामान अंदाज व पीक कॅलेंडर
•
नियोजन सुधारते, हवामानाच्या जोखमी कमी होतात आणि इनपुट कार्यक्षमता वाढते.
• meeTAG ट्रेसिबिलिटी टूल
शेतीमालाला डिजिटल ओळख देऊन ट्रेसिबिलिटी, प्रमाणपत्र आणि शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यास मदत.
• क्लस्टर-आधारित तैनाती व फील्ड सपोर्ट
नियमित प्रशिक्षण, सुरळीत अंमलबजावणी आणि प्रदेशनिहाय सहाय्य.
मीरो डिजिटल लॅब्स सध्या डाळिंब, द्राक्षे, केळी, ऊस, टोमॅटो, बटाटा, मका आणि आंबा या पिकांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान व सखोल फील्ड-एक्सपर्टीजसह काम करत आहे.
किसान २०२५ मध्ये भेट देणाऱ्यांना आधुनिक शेतीसाठी विकसित होत असलेली AI-आधारित आगामी नवकल्पनाही पाहता येतील.
किसान या व्यासपीठाद्वारे शेतकरी, कृषीव्यवसाय, नवोन्मेषक आणि धोरण-निर्माते एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर मीरो डिजिटल लॅब्स भारताला डिजिटल, शाश्वत आणि डेटा-आधारित शेतीकडे नेण्यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.
*स्टॉल १५१ ला अवश्य भेट द्या
आणि स्मार्ट फार्मिंगचे भविष्य अनुभवा*


