Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस...

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस आणि सृजनसभा, पुणे तर्फे आयोजन

पुणे : शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांमधील संगीत व नृत्य विषयक सुप्त गुणांना वाव देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस आणि सृजनसभा, पुणे तर्फे प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ व २० डिसेंबर रोजी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नऱ्हे येथे ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. वयवर्षे १० ते १७ (इयत्ता ५ वी ते १२ वी) आणि वयवर्षे १८ ते ३० (महाविद्यालयीन व खुला गट) अशी स्पर्धा होईल. शुक्रवार, दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समूहगीत स्पर्धेत देशभक्तीपर गीत हा विषय आहे. त्यानंतर छोटा ख्याल गायन स्पर्धा ही एकल प्रकारात होणार आहे.

 

शनिवार, दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समूहनृत्य स्पर्धा देशभक्तीपर गीतावर होणार आहे. तसेच त्यानंतर शास्त्रीय नृत्य/ महाराष्ट्रीय लोकनृत्य या प्रकारात स्पर्धा होणार आहे. विज्येत्यांना एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिकची पारितोषिके आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागासाठी नोंदणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून ९८५००१०२९७, ७८७५५१६७५३, ७२४९२८२६८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments