पुणे, १०डिसेंबर २०२५ : अवघ्या १२ तासांमध्ये अधिक इंधन कार्यक्षमता सिद्ध करत नुकत्याच दाखल झालेल्या टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सच्या टाटा सिएराची दखल इंडिया बुक आँफ रेकाँर्डने घेतली आहे. नॅट्रॅक्स इंदौर येथे प्रमाणित ड्राइव्हमध्ये सिएराने तब्बल २९.९ किमी/लीटरची अपवादात्मक इंधन कार्यक्षमता दिली. यामुळे आतापर्यंतच्या इंधन कार्यक्षमतेचे सर्व रेकाँर्ड टाटा सिएराने मागे टाकले आहेत.
पिक्सल मोशन टीमने ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत १.५ लीटर हायपेरियन-पॉवर्ड सिएरा ड्राइव्ह केली. याच दिवशी या विक्रमाला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली.
या यशामागे प्रमुख श्रेय गाडीच्या १.५ लीटर हायपेरियन पेट्रोल इंजिनला जाते. कारण सुधारणा, कार्यक्षमता किंवा ड्रायव्हिंग क्षमतेबाबत तडजोड न करता उच्च कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामधील प्रगत कम्बशन सिस्टम, टॉर्क-संपन्न परफॉर्मन्स बँड आणि घर्षण अनुकूल रचनेने संपूर्ण ड्राइव्हदरम्यान सतत इंधन वितरण व स्थिर कामगिरीची खात्री दिली. या यशामधून हायपेरियन पॉवरट्रेनची अभियांत्रिकी नाविन्यता आणि क्षमता दिसून येते.
या यशाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. मोहन सावरकर म्हणाले, ”सिएरा प्रवासामध्ये इतक्या लवकर राष्ट्रीय स्तरावर कार्यक्षमता विक्रम स्थापित करणे आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. हायपेरियन इंजिन प्लॅटफॉर्म पेट्रोल पॉवरट्रेन्स संपादित करू शकणाऱ्या बाबींमधील मर्यादांना दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि हा महत्त्वपूर्ण टप्पा त्या प्रयत्नांना सार्थ ठरवतो. तसेच, हे यश ग्राहकांसाठी सिएराचे मूल्य तत्त्व अधिक प्रबळ करते आणि बाजारपेठेत प्रगत, कार्यक्षम व भविष्याकरिता सुसज्ज तंत्रज्ञान सादर करण्याप्रती टीएमपीव्हीच्या कटिबद्धतेला सादर करते.”
टाटा सिएराने नॅट्रॅक्स, इंदौर येथे विशिष्ट चाचणी स्थिती अंतर्गत २२२ किमी/तासचा टॉप स्पीड देखील संपादित केला, ज्यामधून समांतर ड्राइव्हमध्ये १.५ लीटर हायपेरियन इंजिनची कार्यक्षमता दिसून येते.
कृपया लक्षात ठेवा:
प्रशिक्षित व तज्ञ ड्रायव्हर्सच्या देखरेखीअंतर्गत नियंत्रणात इंधन कार्यक्षमता आणि टॉप-स्पीड चाचण्या घेण्यात आल्या.
टीएमपीव्ही ग्राहकांना अशा प्रकारे ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला देते. सर्व कारमालकांना वाहतूकीचे नियम, तसेच निर्धारित केलेल्या गतीमर्यादांचे पालन करण्याचे आणि नेहमी सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ग्राहकांना वितरित करण्यात येणाऱ्या वेईकल्सची अधिकतम गती १९० किमी/तास असेल, जी टीएमपीव्हीच्या शिस्तबद्ध सुरक्षा मानकांनुसा
र आहे.


