Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोरपीस आणि पिंपळपान' ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (दि.१३) लेखक डॉ. रामचंद्र उर्फ...

मोरपीस आणि पिंपळपान’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (दि.१३) लेखक डॉ. रामचंद्र उर्फ बाळ विष्णू परांजपे ; भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणार देणगी

पुणे : लेखाचे आशयानुरूप शीर्षक, सुंदर आणि अर्थपूर्ण रेखाचित्रे तसेच विविधांगी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या डॉ. रामचंद्र उर्फ बाळ विष्णू परांजपे लिखित ‘मोरपीस आणि पिंपळपान’ ललित लेख संग्रहाचे प्रकाशन शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मंडळाला १ लाख रुपयांची देणगी देखील डॉ. eeपरांजपे देणार आहेत.

 

स्मिता टाईपसेटर्स, पुणे आणि डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या ललित संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म.जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. डॉ. रामचंद्र परांजपे यांचे वडील अ‍ॅड.वि.रा.उर्फ बापूसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणगी देखील देण्यात येणार आहे.

 

डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे यांच्या या ललित लेखसंग्रहामध्ये २७ लेखांचा अंतर्भाव आहे. आपले सणवार, परंपरा, जीवनशैली याबाबतचे अनेक संदर्भ लेखांमध्ये आहेत. लेख संग्रहातील वर्णनशैली प्रासादिक आणि सहजसंवादी आहे. यामुळे वाचनापर्यंत यातील संदेश सहज पोहोचू शकणार आहे. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्मिता टाईपसेटर्सचे हेमंत जोशी यांनी केले आहे.

 


——

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments