पुणे, १२ डिसेंबर २०२५: M|O|C कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरने वेस्टिन, पुणे येथे १२-१४ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ONCO 3Sixty २०२५ या आपल्या पहिल्याच प्रमुख राष्ट्रीय ऑन्कोलॉजी परिषदेचे उद्घाटन केले. ही तीन दिवसीय परिषद भारताचा सर्वाधिक प्रभावशाली वैज्ञानिक मंच बनू पाहत आहे, जिथे देशभरातील अग्रगण्य चिकित्सक, संशोधक व इनोव्हेटर्स एकत्र जमणार आहेत. उच्च स्तरीय संवाद, अर्थपूर्ण बातचित व अत्यंत आधुनिक ज्ञानाची देवाणघेवाण यांना चालना देण्याच्या हेतूने आखण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये भारतातील कर्करोगाच्या देखभालीच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकेल, अशा चर्चा आकारास येत आहेत.
ONCO 3Sixty २०२५ मध्ये २०२२ हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील, कर्करोगाच्या विविध अभ्यासशाखांमध्ये कार्यरत असलेल्या ऑन्कोलॉजिस्ट्सना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे व या परिषदेत रुग्णांच्या उदाहरणांवरील संवादात्मक चर्चा तसेच परखड वैज्ञानिक वादविवादांचा समावेश असणार आहे. जागतिक प्रतिनिधीत्वाची बाजू अधिक प्रबळ करत या परिषदेमध्ये आठ प्रतिथयश ऑन्कोलॉजी लीडर्सचे स्वागत करण्यात आले, ज्यांच्या उपस्थितीमुळे वैज्ञानिक चर्चांना अधिक खोली व जागतिक दृष्टिकोन मिळत आहे. प्रिसिशन ऑन्कोलॉजी, टार्गेटेड थेरपीज, मॉलेक्युलर ऑन्कोलॉजी, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि प्रगत उपचारात्मक धोरणे या विषयांतील त्यांचे तज्ज्ञत्व चिकित्सकांना या क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या सुधारणांचा मागोवा घेण्यास तसेच या नव्या संकल्पना भारतीय संदर्भात प्रभावीपणे कशाप्रकारे वापरता येतील हे समजून घेण्यास मदत करत आहे.
मान्यवर आंतरराष्ट्रीय विषयतज्ज्ञांमध्ये मॅकारी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉ. अॅलिसन झँग व युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनचे डॉ. अॅडम ब्रफ्स्की यांचा समावेश आहे. हे दोन्ही तज्ज्ञ प्रिसिशन ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रातील आपल्या कामासाठी सर्वत्र सुपरिचित आहेत. त्यांच्याबरोबर मायो क्लिनिकचे डॉ. अॅक्सेल ग्रॉथी, यूटी हेल्थ सॅन अँटोनियोच्या डॉ. दारुका महादेवन आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडॉ कॅन्सर सेंटरचे डॉ. रॉस कॅमिज हेही या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. यातील प्रत्येक तज्ज्ञाकडून मिळणारे विशेषीकृत सखोल ज्ञान वैज्ञानिक व्याख्यानांना लक्षणीयरित्या समृद्ध बनवित आहे.
या परिषदेमध्ये बोलताना M|O|C कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर, पुणे येथील सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “ONCO 3Sixty ने जागतिक स्तरावर लागणारे नवनवे शोध व भारतीय क्लिनिकल प्रॅक्टिस यांच्यातील एक सशक्त पूल म्हणून आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. अर्थपूर्ण संवाद, सहयोग व वैज्ञानिक दृढता यांमुळे देशभरातील रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळण्याच्या कामास गती मिळू शकते यावरील आमच्या विश्वासाला या वर्षीच्या सत्रामधून नव्याने पुष्टी मिळाली आहे. ऑन्कोलॉजीतील काही अत्यंत प्रखर बुद्धिवंतांना एकत्र आणणारा व कर्करोग देखभाल क्षेत्राच्या सातत्यपूर्ण प्रगतीस प्रेरणा देणारा एक मंच निर्माण केल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
या परिषदेमध्ये कर्करोगाच्या दहाहून अधिक प्रमुख जागांवरील चर्चांचा समावेश आहे, ज्यात उदयोन्मुख उपचारपद्धती, उपचारांची बदलती प्रतिमाने व प्रत्यक्ष व्यवहारातील चिकित्सात्मक उपयोजन यांच्यावरील चर्चांचा विशाल पट सामावून घेतला जात आहे. ONCO 3Sixty २०२५ च्या केंद्रस्थानी असलेले ठळक वैशिष्ट्य म्हणजे केसेसवर आधारित शिक्षणावर दिलेला भर, ज्यामुळे सहभागींना वास्तवातील चिकित्सात्मक प्रसंगांची व मल्टिडिसिप्लिनरी निर्णय-प्रक्रियेची सखोलपणे माहिती करून घेता येते. या दृष्टिकोनामुळे परिषदेत दिल्या जाणाऱ्या वैज्ञानिक माहितीचे उपयोजन अधिक प्रभावीपणे करता येते.
ONCO 3Sixty २०२५ पार पडत असताना, या परिषदेने भारतातील ऑन्कोलॉजी परिषदांसाठी आधीच एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या परिषदेची व्याप्ती, वैज्ञानिक दृढता आणि जागतिक सहभाग यांच्यामुळे हा कार्यक्रम प्रगत कर्करोग देखभालीप्रती आणि अधिक माहितगार, सहयोगाच्या तत्वावर काम करणारी व भविष्यासाठी सुसज्ज अशा ऑन्कोलॉजी समुदायाची जोपासना करण्याप्रती M|O|Cच्या अविचल बांधिलकीचे मूर्त रूप बनला आहे.


