Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedहंगामा ओटीटी ने सादर केली ‘विन्नी की किताब’ – स्वतःची कहाणी धैर्याने...

हंगामा ओटीटी ने सादर केली ‘विन्नी की किताब’ – स्वतःची कहाणी धैर्याने पुन्हा लिहिणाऱ्या विन्नीची कथा

मुंबई, 12 डिसेंबर 2025 – भारतातील अग्रगण्य हिंदी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीवर 11 डिसेंबर 2025 पासून नवीन ओरिजिनल सीरिज ‘विन्नी की किताब’ स्ट्रीमिंगला सुरू होत आहे. सहा भागांच्या या धाडसी मालिकेत आलिशा पनवार नव्या रूपात दिसणार असून त्यांच्यासोबत अभिषेक कपूर, संजय गगनानी, मानसी जैन आणि अफरीन अल्वी यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.

कसोलच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घडणारी ‘विन्नी की किताब’ ही मालिका मालिका विन्नीची कथा सांगते. विन्नी ही एका छोट्या गावातील, शांत स्वभावाची मुलगी आहे. विन्नी तिच्या मनातील सगळ्या इच्छा आणि कल्पना एका खासगी डायरीत लिहित असते, आणि कधीच कल्पना करत नाही की यामुळे तिच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होईल. पण जेव्हा तिचे अतिशय खाजगी विचार अनपेक्षितपणे जगासमोर उघड होतात, तेव्हा विन्नीसमोर एक मोठा निर्णय उभा राहतो- तो म्हणजे गप्प बसून सर्व सहन करायचे की आपली स्वतःची कहाणी परत मिळवण्यासाठी धैर्याने उभे राहायचे.

इच्छा आणि सन्मान, लाज आणि धैर्य यांच्यामध्ये अडकलेली विन्नी स्वतःला समजून घेण्यासाठी एक नवा प्रवास सुरू करते. या प्रवासात ती समाजाच्या मतांना सामोरी जाते आणि स्वतःची कहाणी स्वतः सांगण्याचे धैर्य मिळवते.

संजिव लांबा, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, हंगामा डिजिटल मीडिया, म्हणाले: “‘विन्नी की किताब’ वेगळी आहे कारण ती अशा आयुष्यांकडे प्रकाश टाकते, ज्यांकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. अनेक स्त्रिया त्यांच्या आत संपूर्ण विश्व लपवून ठेवतात. ही मालिका त्या आतल्या मनाच्या जगाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निवडींना मोकळी जागा देते.”

विन्नीची भूमिका साकारणारी आलिशा पनवार म्हणते: “विन्नी ही माझ्यासाठी सर्वांत आव्हानात्मक भूमिका आहे. बाहेरून ती शांत आणि संयमी दिसते, पण आत तिच्या मनात भावनांचे आणि संघर्षाचे वादळ आहे. तिची शांतता, ताकद आणि बंडखोरपणा दाखवणे ही भूमिका साकारताना मला खूप प्रेरणा आणि समाधान मिळाले.”

विन्नीचा पती नवनीत नौटियालची भूमिका करणारा अभिषेक कपूर म्हणतो: “या मालिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती दाखवते की शांत दिसणाऱ्या आयुष्यातही किती मोठे संघर्ष दडलेले असतात. विन्नीच्या बदलाच्या प्रवासाचा भाग होणे आणि त्यांच्या नात्याच्या भावनिक गुंतागुंतीचा अनुभव घेणे माझ्यासाठी खूप रोचक अनुभव होता.”

ताकदवान खलनायिका सरलाची भूमिका साकारणारी मानसी जैन म्हणते: “सरलाचा विश्वासघात मालिकेचा टर्निंग पॉइंट बनतो. ती विन्नीला तिची डायरी तिच्या पतीमार्फत प्रकाशित करायला भाग पाडते. प्रत्यक्ष जीवनात मी तिच्या कृत्यांना कधीच योग्य म्हणणार नाही, पण ही भूमिका साकारताना खूप तीव्र आणि नाट्यमय अनुभव आला.”

पब्लिशरची भूमिका करणारे संजय गगनानी पुढे म्हणतात: “‘विन्नी की किताब’ ही नेहमीच्या मालिकेपेक्षा वेगळी आहे. ही माणसांच्या चुका, महत्वाकांक्षा आणि त्यांचे परिणाम यांवर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक पात्रात थोडे चांगले आणि थोडे वाईट गुण असतात, त्यामुळे कथा अधिक खरी आणि मनोरंजक बनते.”

अफरीन अल्वी मालिकेच्या भावनिक बाजूवर बोलताना म्हणते: “ही कथा अनेक स्त्रिया घराच्या चार भिंतीत सहन करत असलेल्या न बोलल्या जाणाऱ्या संघर्षांना उजाळा देते. मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते म्हणजे या मालिकेत इच्छा, सन्मान आणि निवडीबद्दल कोणताही निर्णय न घेता किती धैर्याने सांगितले गेले.”

‘विन्नी की किताब’ एका अशा महिलेची कथा आहे जी आयुष्यभर इतरांच्या अपेक्षेनुसार जंगली, पण तिच्या मनातील भावना, इच्छा आणि संघर्ष शेवटी तिला बदलण्यासाठी मार्ग दाखवतात. साध्या कथनशैलीत आणि धाडसी विषयांसह ही मालिका शांतपणे जगणाऱ्या, पण मनात मोठे स्वप्न बाळगणाऱ्या स्त्रियांचे जीवन प्रभावीपणे दाखवते.

हंगामा ओटीटी बद्दल

हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा एक भाग असलेला हंगामा ओटीटी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे एकाच ठिकाणी नवीन गाणे, हिट चित्रपट, आकर्षक ओरिजिनल शोज, लोकप्रिय म्युझिक व्हिडिओ आणि पॉडकास्ट यांसारखे विविध मनोरंजनाचे प्रकार उपलब्ध आहेत.

या प्लॅटफॉर्मवर हॉलीवूड, बॉलीवूड आणि भारतातील विविध प्रादेशिक भाषांतील मोठे चित्रपट, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आणि कंटेंट सहज पाहता येतात. हंगामाने ओरिजिनल प्रोग्रामिंग सुरू करताच भारतातील डिजिटल कंटेंटला नवा आकार दिला आहे. हंगामा ओरिजिनल्स अंतर्गत हा प्लॅटफॉर्म पारंपारिक कथाकथनापलीकडे जाऊन, डिजिटल प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि नव्या पद्धतीच्या कथा तयार करतात.

ओरिजिनल्स व्यतिरिक्त, हंगामा व्हिडिओ लायब्ररीमध्ये इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतील 5000 पेक्षा जास्त चित्रपट आणि 1500 हून अधिक शॉर्ट फिल्म्सचा मोठा संग्रह आहे. यासोबतच, मुलांसाठी आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी 7500+ तासांचे कंटेंट विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे, आणि संगीत, चित्रपट गॉसिप, विनोद, अध्यात्म आणि इतर विविध प्रकारच्या 1,50,000 पेक्षा जास्त शॉर्ट व्हिडिओजची मोठी कॅटलॉगही उपलब्ध आहे.

हंगामाच्या म्युझिक लायब्ररीमध्ये 3 कोटीहून अधिक गाणी, म्युझिक व्हिडिओ आणि पॉडकास्ट आहेत, जे 20 पेक्षा जास्त भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांचे ओरिजिनल कंटेंट, ऑनलाइन रेडिओ चॅनेल्स आणि क्युरेटेड प्लेलिस्ट्सही उपलब्ध आहेत. अॅप अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सोबत जोडलेले असल्याने कारमध्येही सुरळीत ऑडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेता येतो.

हंगामाने ग्राहकांसाठी विविध प्लॅटफॉर्मवर अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात टाटा प्ले बिंज, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही आणि डोर टीव्ही यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी कृपया www.hungama.org

येथे भेट द्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments