पुणे,12 डिसेंबर 2025 : समृध्द वारसा असलेल्या पुण्यातील व्हीनस ट्रेडर्स व सीटी पुंडोल तर्फे अलिशान लेखन उपकरणे आणि ॲक्सेसरीज साठी व्हिडोल या प्रशस्त दालनाचे एमजी,रोड येथे उद्घाटन करण्यात आले आहे. व्हीनस ट्रेडर्स हे स्टेशनरी, कला साहित्य आणि लेखन उपकरणांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे,तर सीटी पुंडोल हे लक्झरी घड्याळे,कलाकुसर,कारागिरी आणि प्रिमियम रिटेल अनुभवांसाठी प्रसिध्द असलेले व 117 वर्षांचा समृध्द वारसा असलेला लोकप्रिय ब्रँड आहे. या दालनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द भारतीय वास्तुविशारद,शिक्षणतज्ञ प्रा.यशवंत पिटकर याबरोबरच व्हीनस ट्रेडर्स चे सुरेंद्र करमचंदानी,प्रमोद करमचंदानी,निखिल करमचंदानी व सीटी पुंडोलचे कावस पुंडोल, अविवा पुंडोल व होरमुझ पुंडोल आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिडोल या दालनाच्या माध्यमातून परंपरा,लक्झरी व आधुनिक अभिजाततेचा शक्तीशाली समन्वय दर्शवण्याचा प्रयत्न आहे.या प्रशस्त दालनात लेखन उपकरणे व ॲक्सेसरीजचे 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय व प्रिमियम ब्रँडसची उत्पादने असून ग्राहकांना अतुलनीय अनुभव प्रदान करतील. व्हिडोल हे अशा प्रकारचे पुण्यातील पहिले बुटीक कॉन्सेप्ट स्टोअर असून कालातीत कारागिरी आणि लेखनाचा आनंद साजरा करते. उत्तम लेखन उपकरणे,लक्झरी ॲक्सेसरीज,कलेक्टर्स आयटम्स , गिफ्टींग सोल्युशन्स आणि एक्सक्लुझिव्ह एडिशन्सची निवडक श्रेणी येथे उपलब्ध आहे. व्हिडोलचा उद्देश व्यावसायिक,पारखी,संग्रहक व भेटवस्तूंचा पर्याय शोधणारा ग्राहकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनणे आहे.
दालनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा.यशवंत पिटकर म्हणाले की, आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात आपण सर्वकाही टाईप करत असतो,अशा काळातही फाऊंटन पेनचे महत्त्व अबाधित आहे. फाऊंटन पेनने लिहिणे ही एक अतिशय वैयक्तिक अनुभूती असते,इतर यांत्रिक व अनौपचारिक पध्दतींपेक्षा ती पूर्णपणे वेगळी असते.दुसरे म्हणजे आपल्या भावना आणि अभिव्यक्ती लेखनातून अधिक अचूकपणे व्यक्त होऊ शकतात,यामध्ये फाऊंटन पेन सारखी लेखन साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या पसंतीनुसार विविध प्रकारचे फाऊंटन पेन,निब आणि शाई उपलब्ध असतात. ज्याद्वारे आपण स्वत:ला व्यक्त करू शकतो. लोकांना वाटते की,फाऊंटन पेन कालबाह्य झाले आहेत,पण माझ्या अभ्यासानुसार मी सांगू शकतो की, प्रत्यक्षात ,फाऊंटन पेन्स लोकप्रियता जगभरात अधिक वाढली आहे. सध्याच्या गतिमान व डिजिटल युगात हस्तलेखनाचे महत्त्व कायम आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,जेव्हा आपण काही लिहितो,मग ते कविता असो,कादंबरी असो किंवा आपल्या मनातून उमटलेले कोणतेही विचार असो,ते अभिव्यक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत: हाताने लिहिणे होय.जेव्हा आपण फाऊंटन पेनने लिहितो,तेव्हा खरं तर आपल्या भावनांचा प्रवाह शाई आणि निबद्वारे कागदावर उतरत असतो,असे म्हणता येईल. लिहिलेल्या मजकूराचा प्रभाव हा कायमस्वरूपी असतो.
दालनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, पूर्वी आपल्याकडे फक्त स्टेशनरीच्या दुकानांचा पर्याय होता,पण व्हिडोलच्या बुटीक संकल्पनेमुळे येथे लेखणी साहित्य खरेदी करण्याचा अनुभव खरोखरच आनंददायी
आहे.


