Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमदर्स रेसिपी’ श्रावणातील उपवासासाठी घेऊन आली आहे पारंपरिक चवीचे आलू-साबुदाणा पापड

मदर्स रेसिपी’ श्रावणातील उपवासासाठी घेऊन आली आहे पारंपरिक चवीचे आलू-साबुदाणा पापड


पुणे, 26th ऑगस्ट 2026: भारतभर अनेक कुटुंबांमध्ये पवित्र श्रावण महिना श्रद्धेने पाळला जातो. या काळात विविध पारंपरिक खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व असते.‘मदर्स रेसिपी’चे आलू-साबुदाणा पापड आलू, साबुदाणा आणि सैंधव मीठ वापरून तयार केले जाते. त्यामुळे श्रावणातील उपवासाच्या दिवसांसाठी अनेक घरांमध्ये हा पापड चांगला आणि चविष्ट पर्याय ठरतो.
श्रावण महिन्यात अनेक घरांमध्ये सात्त्विक भोजन केले जाते. उपवासाच्या पदार्थांमध्ये पारंपरिकरित्या वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना आणि घटकांना यावेळी विशेष महत्त्व असते. देशभरात उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाणा आणि आलूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आलू पापड आणि साबुदाणा पापड हे याच परिचित पदार्थांचा वेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने आस्वाद घेण्याचा एक पर्याय आहे.
यावेळी बोलताना मदर्स रेसिपीच्या एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर संजना देसाई म्हणाल्या, “आपल्या सण-उत्सवांचा आणि परंपरांचा खाद्यपदार्थांशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक कुटुंबाच्या उपवासाच्या पद्धती आणि पारंपरिक पाककृती वेगवेगळ्या असतात. साबुदाणा आणि आलू हे उपवासाच्या पदार्थांमध्ये नेहमी वापरले जाणारे पदार्थ आहेत. आमचे आलू आणि साबुदाणा पापड या उपवासाच्या पदार्थांमध्ये सहजपणे समाविष्ट करता येतात आणि ते तयार करणेही सोपे आहे.”
हे पापड उपवासाच्या फराळासोबत कुरकुरीत पदार्थ म्हणून तळून खाता येतात किंवा ते नुसते स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. हे पापड दही, उपवासाची चटणी, साबुदाणा खिचडी, फराळाचे पदार्थ किंवा इतर उपवासाच्या पदार्थांसोबत सर्व्ह करता येतात. हे पापड तयार करणे सोपे असल्यामुळे श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवसांत हा एक सोयीचा पर्याय ठरू शकतो.
मदर्स रेसिपीने भारतीय घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे आणि आवडीने खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये सण-उत्सवांमध्ये आवडीने खाल्या जाणाऱ्या तसेच रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश आहे.
आलू आणि साबुदाणा पापडाची किंमत 70 ग्रॅमच्या पॅकसाठी 36 रुपये आहे. हे पापड महाराष्ट्रासह उत्तर भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना हे पापड डी-मार्ट आणि रिलायन्स रिटेल सारख्या दुकानांमध्ये तसेच ब्लिंकइट, झेप्टो आणि बिगबास्केट वरही मिळतील. श्रावण महिन्यात या पापडांवर विशेष हंगामी ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

मदर्स रेसिपी विषयी
देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा मदर्स रेसिपी हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह खाद्य ब्रँड्सपैकी एक असून, आपल्या अस्सल चवीसाठी आणि पारंपरिक पाककृतींसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडकडे लोणची, पेस्ट, रेडी-टू-कूक मिक्स, चटण्या आणि पापड अशा विविध उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. आधुनिक व्यापार, किरकोळ विक्री आणि ई-कॉमर्समध्ये मजबूत उपस्थितीसह, मदर्स रेसिपीची उत्पादने 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. पुणे, कोलकाता आणि भरोडा येथील त्यांच्या उत्पादन केंद्रांमध्ये उच्च दर्जाच्या गुणवत्ता मानकांचे पालन केले जाते, ज्यामुळे प्रत्येक उत्पादनासोबत शुद्धता आणि चवीचे तेच आश्वासन मिळते, ज्यावर अनेक पिढ्यांचा विश्वास आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या – www.mothersrecipe.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments