भारतातील आघाडीच्या व्हर्टिकल एकात्मिक सौर फोटोव्होल्टेइक उत्पादकांपैकी एक असलेल्या अवाडा इलेक्ट्रो लिमिटेडने 31 जुलै 2026 रोजीच्या कार्यरत सौर सेल आणि मॉड्यूल उत्पादन क्षमतेच्या आधारे 7,600 कोटी रु.च्या आयपीओसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे अद्ययावत ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (यूडीआरएचपी) दाखल केला आहे.
कंपनीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 1,600 कोटी रु.किंमती पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 6,000 कोटी रु.पर्यंतच्या किंमतीची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण ऑफरचा आकार 7,600 कोटी रु.पर्यंत असेल. इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रती शेअर 5 रु. आहे. 6,000 कोटी रु.पर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) प्रवर्तक विक्री समभागधारक अवाडा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात येईल.
फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग प्रामुख्याने कंपनीने घेतलेल्या काही कर्जांशी आणि लेटर्स ऑफ क्रेडिटअंतर्गत स्वीकारलेल्या दायित्वांशी संबंधित कर्जदात्यांना करावयाच्या आगाऊ परतफेडी, परतफेड आणि/किंवा देयकांच्या दायित्वांसाठी वापर करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 1,200 कोटी रु.पर्यंतची रक्कम अंशतः किंवा पूर्णतः वापरली जाईल. उर्वरित निव्वळ रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.
मूळ कंपनी अवाडा ग्रुपच्या पाठबळावर आणि अध्यक्ष विनीत मित्तल यांच्या नेतृत्वाखाली, तसेच व्यावसायिक व्यवस्थापन टीमच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या अवाडा इलेक्ट्रोची स्थापना 2021 मध्ये झाली असून ती अक्षय ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी सौर सेल आणि मॉड्यूल्सच्या उत्पादनात विशेष प्रावीण्य राखते. सौर मॉड्यूल्सची विक्री एनल्यूम आणि इंटेग्लो या ब्रँड नावांखाली 14 वितरक आणि 13 राज्यांमध्ये केली जाते.
अवाडा ग्रुपच्या विश्वासार्हतेला ब्रुकफिल्ड ग्लोबल ट्रान्झिशन फंड-I, ग्लोबल पॉवर सिनर्जी कंपनी (GPSC, PTT ग्रुप थायलंडचा भाग), एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB), DEG (Deutsche Investitions- und Entwicklungsgesellschaft), Nederlandse Financierings – Maatschappij voor Ontwikkelingslanden N.V. आणि प्रोपार्को यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांकडून दीर्घकाळापासून मिळत असलेल्या पाठबळामुळे आणखी बळकटी मिळत आहे.
AELच्या संचालक मंडळात अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक विनीत मित्तल; उपाध्यक्ष आणि बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक सिंदूर मित्तल; पूर्णवेळ संचालक विनू जॉर्ज; माजी एसबीआय अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक रजनीश कुमार; स्वतंत्र संचालक डायना मिलर आणि स्वतंत्र संचालक सुभाष कामथ यांचा समावेश आहे.
अवाडा इलेक्ट्रोकडे बॅकवर्ड इंटिग्रेटेड सौर मॉड्यूल आणि सेल उत्पादन सुविधा आहे. सध्या कंपनीकडे 8.5 GW क्षमतेची कार्यरत सौर मॉड्यूल उत्पादन क्षमता आणि 3.00 GW क्षमतेची कार्यात्मक टनेल ऑक्साइड पॅसिव्हेटेड कॉन्टॅक्ट (“TOPCon”) सौर सेल उत्पादन क्षमता आहे.
लवचिकता, खर्चाच्या दृष्टीने सुयोग्य आणि धोरणात्मक स्वायत्तता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक, व्हर्टिकली एकात्मिक सौर उत्पादन परिसंस्था उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत सौर मॉड्यूल उत्पादन क्षमता 13.60 GW, सौर सेल उत्पादन क्षमता 12.00 GW आणि इंगॉट व वेफर उत्पादन क्षमता 3.00 GW पर्यंत वाढविण्याची कंपनीची अपेक्षा आहे. प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, इंगॉट, वेफर, सौर सेल आणि सौर मॉड्यूल उत्पादनाचा समावेश असलेल्या संपूर्ण मूल्यसाखळीत व्हर्टिकली एकात्मिक स्वरूपात कार्य करण्याच्या स्थितीत कंपनी असेल.
कंपनीच्या वाढीच्या आणि विविधीकरणाच्या योजनांमध्ये “अवाडा हेलो” या ऊर्जा साठवणुकीच्या उपायाचे सादरीकरण करण्याचाही कंपनीचा विचार आहे. हा उपाय कंपनी आपल्या सौर मॉड्यूल विक्रीसोबत एकत्रित करणार असून थर्ड पार्टी EPC आणि O&M विभागांमध्ये प्रवेश करणार आहे.
उपकंपनीच्या स्तरावर जर्मनीतील RCT आणि ISC कॉन्स्टान्झ, जर्मनी यांच्यासोबतच्या तंत्रज्ञान सहकार्याच्या पाठबळावर, कंपनीची उत्पादने त्यांची कार्यक्षमता आणि वीज उत्पादन क्षमतेच्या आधारे वेगळी ठरतात. 720 Wp TOPCon सौर मॉड्यूल्स सादर करणाऱ्या भारतातील पहिल्या उत्पादकांपैकी कंपनी एक होती. ही मॉड्यूल्स अनेक प्रगत सौर सेल फॉरमॅट्सशी सुसंगत आहेत.
कंपनीने आपल्या विद्यमान मॉड्यूल-उत्पादन लाइनमध्ये N-type TOPCon तंत्रज्ञान स्वीकारले आहे आणि ही मॉड्यूल्स 30 वर्षांच्या कार्यकाळासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. उद्योगाच्या सरासरी सुमारे 4% च्या तुलनेत सेल-ते-मॉड्यूल ऊर्जा तूट सुमारे 2% आहे. याशिवाय, व्यावसायिकरित्या सूचीबद्ध असलेल्या कंपनीच्या बायफेशियल ग्लास-टू-ग्लास TOPCon मॉड्यूल्सची कार्यक्षमता 23.61% पर्यंत आहे. N-type TOPCon मॉड्यूल्सचा बायफेशियलिटी दर सुमारे 80–85% आहे, तर पारंपरिक PERC मॉड्यूल्ससाठी तो सुमारे 70–75% आहे.
अलीकडेच, Kiwa PVEL 2026 PV Module Reliability Scorecard मध्ये लागू असलेल्या विश्वासार्हता आणि टिकाऊपणाच्या चाचण्यांमध्ये कंपनीच्या मॉड्यूल्सना सर्वोत्तम कामगिरी बजावणारे “Top Performer” म्हणून मान्यता मिळाली.
अवाडा इलेक्ट्रोकडे सध्या दोन कार्यरत उत्पादन सुविधाकेंद्रे आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील दादरी येथील प्रगत आणि पूर्णपणे कार्यरत युनिटचा समावेश आहे. या युनिटची वार्षिक मॉड्यूल-उत्पादन क्षमता 1.5 GW आहे. तसेच महाराष्ट्रातील नागपूर येथील कंपनीच्या प्रमुख एकात्मिक सुविधा केंद्रात 7 GW ची कार्यरत मॉड्यूल उत्पादन क्षमता आणि 6 GW क्षमतेची सौर सेल सुविधा आहे. यापैकी 3 GW क्षमता कार्यरत असून, आणखी 3 GW क्षमतेचे सुविधा केंद्र कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. हे सुविधा केंद्र 30 सप्टेंबर 2026 रोजी संपणाऱ्या तिमाहीत कार्यरत होणे प्रस्तावित आहे.
दादरी सुविधाकेंद्र बांधकाम सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांत कार्यान्वित करण्यात आले तर नागपूर सुविधाकेंद्र ग्रीनफिल्डपासून कार्यान्वित होण्याच्या स्थितीपर्यंत सात महिन्यांत विकसित करण्यात आले. भारतात याच प्रमाणातील सुविधा केंद्रांच्यामध्ये ही दोन्ही सुविधाकेंद्रे सर्वात जलद कार्यान्वित झालेल्या सुविधा केंद्रांपैकी आहेत.
अवाडा ग्रुप आपल्या उत्पादन सुविधा केंद्रांच्या जवळ सौर काच, अॅल्युमिनियम फ्रेम्स आणि एन्कॅप्सुलंट्स यांसारख्या व्यवसायातील महत्त्वाच्या पूरक घटक आणि साहित्याच्या धोरणात्मक सह-स्थानाची प्रक्रिया राबवत आहे. या व्यवस्थेमुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, प्रक्रियेचा कालावधी कमी होईल आणि अधिक प्रतिसादक्षम इन्व्हेंटरी व्यवस्थापन शक्य होईल.
उत्पादन प्रक्रियेचा वेग दर्शवणारा आणि एक मॉड्यूल तयार करण्यासाठी लागणारा वेळ मोजणारा AELचा सरासरी सायकल टाइम केवळ 16 सेकंद होता. हा उद्योग क्षेत्रातील सर्वात जलद सायकल टाइमपैकी एक आहे. 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार जोडणी क्षमतेच्या प्रति GW कंपनीचा भांडवली खर्च भारतातील समान क्षमतेच्या सुविधांसाठी असलेल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे.
बहुतांश सौर मॉड्यूल उत्पादक त्यांच्या नवीन उत्पादन लाइनची सुरुवात ग्लास-टू-बॅकशीट (“G2B”) कॉम्बीनेशनने करतात आणि त्यानंतर ग्लास-टू-ग्लास (“G2G”) पद्धतीकडे वळतात. मात्र, अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा विचार करता आपल्या दोन्ही सुविधांमध्ये थेट G2G सौर मॉड्यूल्ससह उत्पादन सुरू करण्यात यश मिळवलेली अवाडा इलेक्ट्रो ही भारतातील मोजक्या सौर PV उत्पादकांपैकी एक आहे.
ALMM च्या List II मध्ये सूचीबद्ध केल्यानुसार कंपनीच्या सौर सेलची कार्यक्षमता 24.5% ते 26.3% दरम्यान आहे आणि भारतातील सर्व प्रस्थापित सौर सेल उत्पादकांमध्ये ती सर्वाधिक आहे.
कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 25 मधील 911.62 कोटी रु.वरून आर्थिक वर्ष 26 मध्ये 5,303.52 कोटी रु. झाला. EBITDA आर्थिक वर्ष 25 मधील 241.68 कोटी रु.वरून वाढून 1,258.86 कोटी रु. झाला, तर करपश्चात नफा आर्थिक वर्ष 25 मधील 173 कोटी रु.वरून आर्थिक वर्ष 26 मध्ये 888.74 कोटी रु. झाला.
समूहातील उपकंपनी अवाडा एनर्जीने प्रमुख ग्राहक म्हणून काम केले आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात 89% योगदान दिले.
केवळ एका वर्षात कंपनीची मॉड्यूल जोडणी क्षमता 1.5 GW वरून 8.5 GW पर्यंत, प्रभावी क्षमता 0.76 GW वरून 6.05 GW पर्यंत आणि उत्पादन 0.63 GW वरून 3.77 GW पर्यंत वाढले. त्याच कालावधीत ऑर्डर बुकमध्ये 7 पटीहून अधिक वाढ होऊन ते 2,555 MW वरून 19,106 MW झाले.
विशेषतः शहरी आणि निमशहरी भागांतील रूफटॉप आणि निवासी ग्राहकांना सेवा देण्यासाठी, तसेच पीएम- सूर्य घर, पीएम- कुसूम आणि DCR शी संबंधित मागणी असलेल्या CPSU सारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कंपनी स्वतःला सज्ज करत आहे. मार्च 2023 मध्ये, उत्पादनाशी जोडलेल्या इन्सेटीव्ह योजनेअंतर्गत कंपनीला 3 GW क्षमतेची एकात्मिक वेफर-ते-मॉड्यूल उत्पादन क्षमता मंजूर करण्यात आली. लागू असलेल्या अटी आणि कार्यान्वयनाच्या कालमर्यादेच्या अधीन राहून, कंपनी 961.62 कोटी रु.पर्यंतच्या इन्सेटीव्हसाठी पात्र आहे.
1 जून 2026 पासून, लागू असलेल्या ALMM चौकटीअंतर्गत समाविष्ट असलेल्या निर्दिष्ट प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सौर मॉड्यूल्ससाठी ALMM List-II अंतर्गत सूचीबद्ध देशांतर्गत उत्पादकांकडून सेल्स घेणे आवश्यक आहे. MNRE ने 2028 पासून देशांतर्गत उत्पादित वेफर्ससाठी म्हणजेच सौर सेल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिशय पातळ, गोलाकार सिलिकॉनच्या चकत्या साठी ALMM List-III लागू करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. यामुळे वेफर्स, सेल्स आणि मॉड्यूल्स या सर्व स्तरांवर क्षमता असलेल्या एकात्मिक देशांतर्गत उत्पादकांसाठी वाढीची महत्त्वपूर्ण संधी निर्माण होऊ शकते.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, BofA सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.


