Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनसीपीए तर्फे युवा संगीतकारांसाठी सिटी शिष्यवृत्ती 2026–28 (हिंदुस्तानी संगीत) जाहीर

एनसीपीए तर्फे युवा संगीतकारांसाठी सिटी शिष्यवृत्ती 2026–28 (हिंदुस्तानी संगीत) जाहीर

 

पुणे, 15 डिसेंबर 2025 — मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) ने हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी एनसीपीए सिटी शिष्यवृत्ती फॉर यंग म्युझिशियन्स 2026–28 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत ख्याल आणि ध्रुपद यांसारख्या गायन परंपरांबरोबरच बासरी, हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, सरोद आदी विविध वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल 2026 ते मार्च 2028 या कालावधीत दोन वर्षांसाठी दरमहा रुपये 10,000 शिष्यवृत्ती दिली जाईल.

 

इच्छुक संगीतकारांनी आपल्या संगीत शिक्षणाची सविस्तर माहिती असलेला बायोडेटा 20 डिसेंबर 2025 पर्यंत indianmusicscholarships@ncpamumbai.com या ई-मेलद्वारे पाठवावा. अर्जामध्ये उमेदवार कोणत्या प्रकारासाठी अर्ज करत आहे—ख्याल, ध्रुपद किंवा एखादे विशिष्ट वाद्य हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांशी संपर्क साधला जाईल व त्यांना ऑडिशनसाठी आमंत्रित केले जाईल. ही ऑडिशन्स फेब्रुवारी 2026 मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे घेण्यात येतील.

 

अर्ज प्रक्रियेबाबत कोणतीही शंका असल्यास उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत 9082620065 या क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments