Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण जागेच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण जागेच्या आंबेडकरी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण जागेच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण जागेच्या आंबेडकरी जनतेच्या लढयाला यश.* आंबेडकरी जनतेच्या लढयाला यश.*

 

 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विस्तारीकरण जागेच्या लढ्याला आज यश आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण समिती, पुणे शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त दौऱ्यात सुध्दा केंद्रीय राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ व भाजप शहरअध्यक्ष धिरज घाटे यांनी गणेश कला क्रिडा मंच येथे शिष्टमंडळाची भेट घडवून दिली.  या भेटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरणाच्या ज्या जागेसाठी समस्त आंबेडकरी जनता लढा देत होते त्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील शिष्ट मंडळाला अश्वासित केले की, सदरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी देण्यात येईल व त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमांमध्ये तशी घोषणा देखील केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, आसित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण समिती, पुणे यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments