Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedगझलेच्या माहौलात "कला साहित्य भूषण" प्रकाशित

गझलेच्या माहौलात “कला साहित्य भूषण” प्रकाशित

 

 

गझल नवाझ भिमराव पांचाळे यांनी भाषणबाजी न करता, संगीताची साथ संगत नसताना त्यांच्या गझला पेश करून असा काही माहौल तयार केला की, त्यांच्या अर्थपूर्ण, आर्त सुरांमध्ये उपस्थित रसिक कधी, कसे हरवले, ते त्यांचे त्यांनाच कळाले नाही! त्यांच्या या गायनाने, “कला साहित्य भूषण ” या पुस्तकाचा मुंबईत झालेला प्रकाशन समारंभ रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.

 

या पुस्तकाचे लेखक

श्री देवेंद्र भुजबळ यांनी या पुस्तकात रेखाटलेल्या व्यक्ति, त्यांची वैशिष्ट्ये,समाजासाठी ते

देत असलेले योगदान याविषयी यावेळी माहिती दिली.पुस्तक प्रकाशनासाठी देश विदेशातून प्राप्त झालेल्या मित्रांच्या, स्नेह्यांच्या शुभेच्छा

लाभल्याने आपल्या आनंदात खूपच भर पडली,असेही त्यांनी सांगितले.

 

कला आणि साहित्य क्षेत्रातील तीस व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेल्या या पुस्तकात गझल नवाझ भिमराव पांचाळे, लेखिका आणि कवयित्री सिंगापूर स्थित मोहना कारखानीस, प्रतिभा सराफ, यांच्याही जीवन कथा असल्याने त्यांच्याहस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, साहित्यिका गौरी कुलकर्णी

डिंपल पब्लिकेशन्सचे अशोक मुळे,भरारी प्रकाशनाच्या लता गुठे, यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments