Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकालिकत येथे होणाऱ्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग ग्रँड फिनालेसाठी फंडफ्लोट ॲकॅडमी आणि...

कालिकत येथे होणाऱ्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग ग्रँड फिनालेसाठी फंडफ्लोट ॲकॅडमी आणि आयआयसी लक्ष्य यांचे भक्कम पाठबळ

इंडियन इनस्टीट्युट ऑफ कॉमर्स (IIC) लक्ष्य यांच्या सहकार्याने फंडफ्लोट ॲकॅडमी तर्फे ISRL सीझन 2 चा राउंड 3 ग्रँड फिनाले सादर

 

• सुपरस्टार सलमान खान 21 डिसेंबर रोजी कोझिकोड येथे होणाऱ्या ISRL सीझन 2 ग्रँड फिनालेसाठी उपस्थित राहणार

• EMS कॉर्पोरेशन स्टेडियम येथे ISRL सीझन 2 अजिंक्यपदासाठी सहा संघांमध्ये होणार थरारक लढत

 

 

 

कालिकत, 17 डिसेंबर 2025: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सीझन 2 चा ग्रँड फिनाले येत्या आठवड्यात 21 डिसेंबर 2025 रोजी कोझिकोड येथील प्रतिष्ठित EMS कॉर्पोरेशन स्टेडियम मध्ये पार पडणार आहे. या अत्यंत उत्कंठावर्धक चॅम्पियनशिप लढतीचे सादरीकरण फंडफ्लोट ॲकॅडमी करत असून इंडियन इनस्टीट्युट ऑफ कॉमर्स (IIC) लक्ष्य, कोझिकोड यांच्या सहकार्याने हा भव्य कार्यक्रम साकारत आहे. मोटरस्पोर्ट्स आणि प्रगत शिक्षण क्षेत्रातील ब्रँड्समधील मजबूत सहकार्याचे हे प्रतीक ठरत आहे.

 

 

 

क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्टता आणि भव्य प्रमाणातील थेट मनोरंजनाचा उत्सव साजरा करणारा हा फिनाले SXI आणि Bandidos Motorsports यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, ISRL चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सुपरस्टार सलमान खान यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या हंगामातील ही सर्वात थरारक आणि संस्मरणीय रेस नाईट ठरण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

ISRL सीझन 2 ग्रँड फिनालेमध्ये 6 फ्रँचायझी संघांमधील 36 आघाडीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्स सीझन 2 चॅम्पियनशिप किताबासाठी स्पर्धा करतील. अंतिम फेरीत तीन अत्यंत चुरशीच्या रेस श्रेणी असतील — 450 सीसी इंटरनॅशनल, 250 सीसी इंटरनॅशनल आणि 250 सीसी इंडिया-एशिया मिक्स. यामध्ये जागतिक दर्जाचे रायडर्स आणि उदयोन्मुख प्रादेशिक प्रतिभा एकाच मंचावर एकत्र येतील.

 

 

 

तिसऱ्या फेरीत प्रवेश करताना गुजरात ट्रेलब्लेझर्स सध्या चॅम्पियनशिप गुणतालिकेत आघाडीवर असून, त्यामुळे अंतिम फेरीत थरारक विजेतेपदाची लढत रंगणार आहे. 30,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित असून, कालिकत फिनाले ISRL च्या मागील दोन सिझन मधील सर्वाधिक एकदिवसीय उपस्थितीचा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. यातून लीगची झपाट्याने वाढणारी लोकप्रियता आणि केरळमधील मोटरस्पोर्ट्स चाहत्यांचा मजबूत पाठिंबा अधोरेखित होतो. ISRL सिझन 2 टीम चॅम्पियन अधिकृतपणे केरळमध्ये घोषित केला जाणार असून, हा लीगसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

 

 

 

हा कार्यक्रम केरळच्या क्रीडाक्षेत्रासाठीही एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. याचे कारण केवळ ISRL पहिल्यांदाच राज्यात आयोजित होत आहे एवढेच नसून EMS कॉर्पोरेशन स्टेडियम सारखी आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा पारंपरिक क्रिकेट आणि फुटबॉलपलीकडे जाऊन जागतिक दर्जाच्या मोटरस्पोर्ट्स स्पर्धांचे यशस्वी आयोजन करू शकते, हेही यानिमित्ताने सिद्ध होणार आहे.

 

 

 

ISRL चे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले, “ISRL सिझन 2 चा ग्रँड फिनाले कोझिकोड येथे आणणे हा लीगसाठी एक मैलाचा दगड आहे. केरळमध्ये मोटरस्पोर्ट्ससाठी अत्यंत उत्साही चाहतावर्ग आहे आणि हा कार्यक्रम मोटरस्पोर्ट्स तसेच स्थानिक खेळाडूंना अधिक ओळख, सुसंघटीत प्रशिक्षण, पायाभूत सुविधा विकास आणि दीर्घकालीन मान्यता मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. फंडफ्लोट ॲकॅडमी, IIC लक्ष्य आणि Bandidos Motorsports यांसारख्या ब्रँड्सकडून मिळणारा पाठिंबा भारतात अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक मोटरस्पोर्ट्स परिसंस्था उभारण्यासाठी मोठी चालना देतो.”

 

 

 

फंडफ्लोट ॲकॅडमीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुहम्मद रमजान म्हणाले, “ISRL मधून जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाचा आणि उत्कृष्टतेच्या अखंड ध्यासाचा समग्र दृष्टीकोन दिसून येतो. ही मूल्ये फंडफ्लोट ॲकॅडमीशी खोलवर जोडलेली आहेत. ISRL सीझन 2 ग्रँड फिनाले सादर करताना आणि भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या पायाभूत विकास, जागतिक व्यासपीठ आणि शाश्वत वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या या मंचाला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. कोझिकोड येथे हा फिनाले होणे यातून हा सहयोग आमच्यासाठी आणखी विशेष बनत आहे.”

 

 

 

इंडियन इनस्टीट्युट ऑफ कॉमर्स (IIC) लक्ष्यचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक ऑरवेल लायोनेल म्हणाले, “IIC लक्ष्य मध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा रेसट्रॅकवर, महत्त्वाकांक्षा आणि कामगिरीला सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. कालिकत येथे होणाऱ्या ISRL सीझन 2 ग्रँड फिनालेसाठी पॉवरिंग पार्टनर म्हणून सहभागी होणे हे केरळच्या तरुण प्रतिभेला जागतिक दर्जाचे अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे सुसंगत आहे.”

 

 

 

कार्यक्रमातील उत्साहात भर घालत, Reise Moto FanPark 20 आणि 21 डिसेंबर रोजी खुले राहणार असून, चाहत्यांना संपूर्ण मोटरस्पोर्ट्स फेस्टिव्हलचा अनुभव मिळणार आहे. यामध्ये लाईव्ह म्युझिक, रेसिंग सिम्युलेटर्स, फूड अँड बेव्हरेज झोन्स, इंटरअ‍ॅक्टिव्ह ब्रँड अ‍ॅक्टिव्हेशन्स, रायडर्ससोबत भेटी, फ्रीस्टाइल शो आणि अधिकृत टीम मर्चेंडाईज यांचा समावेश असेल.

 

 

 

ISRL सिझन 2 ग्रँड फिनालेची तिकिटे आता बुक माय शो वर उपलब्ध असून, चाहत्यांना थेट स्टँड्समधून चॅम्पियनशिपची लढत पाहण्याची संधी मिळणार आहे. शर्यती FanCode वर लाईव्ह आणि ऑन-डिमांड स्ट्रीम केल्या जातील, Eurosport India वर प्रसारित केल्या जातील आणि ISRL च्या अधिकृत YouTube चॅनलवर जागतिक स्तरावर स्ट्रीम केल्या जातील. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना सहजी याचा आनंद घेता येईल. चाहते #FlirtWithDirt या हॅशटॅगद्वारे सोशल प्लॅटफॉर्मवर वाढत्या सुपरक्रॉस समुदायात सहभागी होऊ शकतात.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments