Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा एआयएतर्फे मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड सादर; जीवनविम्यासह बाजाराशी संलग्न वाढीची संधी

टाटा एआयएतर्फे मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड सादर; जीवनविम्यासह बाजाराशी संलग्न वाढीची संधी

 

 

 

टाटा एआयएच्या युलिप्सद्वारे गुंतवणूक केल्यास जीवनविमा संरक्षणासह नवीन मल्टिकॅप फंडतर्फे मोठ्या, मध्यम आणि कमी कॅपमध्ये वैविध्यपूर्ण इक्विटी गुंतवणुकीची संधी

 

 

 

मुंबई, १९ डिसेंबर 2025: जागतिक अनिश्चितता आणि विविध क्षेत्रांतील चढउतारांमुळे आजच्या अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधणारे धोरण स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. या गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी वैविध्यपूर्ण दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो. विविध क्षेत्रांमध्ये, मालमत्ता वर्गांमध्ये आणि वेगवेगळ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक विभागल्यास कोणत्याही एकाच बाजार विभागावर अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीस मदत होते.

 

 

 

भारताच्या विकासाची गाथा आता अधिक व्यापक होत असून पारंपरिक उद्योग, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच मोठ्या भांडवलाच्या कंपन्यांपासून ते आश्वासक मध्यम व कमी भांडवलाच्या कंपन्यांपर्यंत सर्व स्तरांवर विस्तारलेली आहे. मल्टिकॅप धोरणामुळे गुंतवणूकदारांना जोखीम कमी करत या व्यापक वाढीचा लाभ घेता येतो. विविध बाजार विभागांमध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन वाढीचा लाभ अनेक आघाड्यांवर मिळतो आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी होतो.

 

 

 

या संधींचा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी टाटा एआयए मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड आणि टाटा एआयए मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज पेन्शन फंड** सादर केले आहेत. हे फंड निफ्टी 500 निर्देशांकावर आधारित विविधीकृत इक्विटी धोरण सादर करतात. त्यायोगे मोठ्या, मध्यम आणि लहान भांडवलाच्या कंपन्यांमध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा व्यापक लाभ मिळतो.

 

 

 

न्यू फंड ऑफर (NFO) कालावधीत, म्हणजेच 24 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान हे दोन्ही फंड प्रति युनिट 10 रु. या प्रारंभिक किमतीत सबस्क्रीप्शनसाठी उपलब्ध असतील. गुंतवणूकदार टाटा एआयएच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स)द्वारे या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामध्ये बाजाराशी संलग्न वाढीसोबतच जीवनविमा संरक्षणाची सुरक्षितताही मिळते.

 

 

 

फंडाची वैशिष्ट्ये:

 

· इक्विटी एक्स्पोजर: 60% ते 100%

 

· डेब्ट आणि मनी मार्केट साधने: कमाल 40% (विविध बाजार परिस्थितींमध्ये जोखीम व्यवस्थापनासाठी)

 

· बेंचमार्क: भारताच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनपैकी 90% पेक्षा अधिक प्रतिनिधित्व करणारा निफ्टी 500 निर्देशांक

 

 

 

संरक्षणासह दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी डिझाइन

 

मोठ्या भांडवलाच्या कंपन्यांची स्थिरता आणि मध्यम व कमी भांडवलाच्या समभागांची वाढीची क्षमता यांचा संगम साधत मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड गुंतवणुकीसाठी संतुलित दृष्टीकोन देतो. लवचिक पोर्टफोलिओ रचनेमुळे गुंतवणूकदार जोखीम व्यवस्थापित करू शकतात आणि भारतातील विविध वाढीच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.

 

 

 

युलिप्सद्वारे हे फंड उपलब्ध करून देत टाटा एआयए ग्राहकांना संपत्ती निर्मिती आणि कुटुंब संरक्षण या दोन्हींचे नियोजन एका एकात्मिक, दीर्घकालीन उपायसुविधेमध्ये करण्यास सक्षम करते. जोडीला, विद्यमान कर कायद्यांनुसार कर सवलतीही लागू होऊ शकतात.

 

 

 

या सादरीकरणाबाबत प्रतिक्रिया देताना टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पाटील म्हणाले: “विविध क्षेत्रांमध्ये आणि विविध आकारांच्या कंपन्यांमध्ये भारताच्या विकासाच्या संधी आता अधिक व्यापक स्वरूपाच्या झाल्या आहेत. मल्टिकॅप धोरण गुंतवणूकदारांना या व्यापकतेत सहभागी होण्यास मदत करते आणि कोणत्याही एका बाजार विभागावर अतिअवलंबित्व टाळते. मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंडद्वारे आम्ही पॉलिसीधारकांना निफ्टी 500 वर आधारित वैविध्यपूर्ण इक्विटी गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी शिस्तबद्ध मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याला टाटा एआयएच्या गुंतवणूक व्यवस्थापन क्षमतांचे पाठबळ आहे. आमच्या युलिप्सद्वारे हा फंड उपलब्ध करून देत, आम्ही ग्राहकांना दीर्घकालीन योजनेचा भाग म्हणून बाजार सहभागासोबत जीवनविमा संरक्षण एकत्र करण्याची संधी देत आहे.”

 

 

 

ग्राहकांनी मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड्स का विचारात घ्यावेत:

 

• एका फंडमध्ये विविधता: एकाच ठिकाणी एकवटलेली गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी अनेक बाजार विभागांमध्ये गुंतवणूक

 

• संतुलित वाढ आणि स्थिरता: मोठ्या कंपन्या स्थिरता देतात, तर मध्यम व लहान कंपन्या वाढीची संधी देतात

 

• जोखीम व्यवस्थापन: कर्ज व मनी मार्केट साधनांमध्ये कमाल 40% वाटप करण्याची लवचिकता

• दीर्घकालीन संपत्ती निर्मिती: अस्थिरतेतून मार्ग काढत भारताच्या विकासाच्या कहाणीत सहभागी होण्यासाठी मल्टिकॅप धोरण

 

• बाजाराशी संलग्न परताव्यासह जीवनविमा संरक्षण: टाटा एआयएच्या युलिप्सद्वारे उपलब्ध

• मजबूत बेंचमार्क संदर्भ: निफ्टी 500 निर्देशांकाने 3, 5 आणि 10 वर्षांच्या कालावधीत प्रमुख निर्देशांकांपेक्षा चांगला परतावा दिला आहे (31 ऑक्टोबर 2025 पर्यंत)

 

 

 

उत्पादन उपलब्धता

 

टाटा एआयए मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड कंपनीच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्समध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये परम रक्षा लाइफ सिरीज (अ‍ॅडव्हान्टेज, ग्रोथ, प्रो आणि मॅक्सिमा), स्मार्ट SIP, फॉर्च्युन प्रो, वेल्थ प्रो, स्मार्ट संपूर्ण रक्षा प्लस, शुभ फॉर्च्युन आणि टाटा एआयए प्रो फिट यांसह इतर पात्र युलिप योजना समाविष्ट आहेत. यामुळे संरक्षण, बचत आणि संपत्ती पोर्टफोलिओमधील ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक योजनांमध्ये वैविध्यपूर्ण इक्विटी गुंतवणूक समाविष्ट करता येईल.

 

 

 

मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज पेन्शन फंड टाटा एआयए स्मार्ट पेन्शन सिक्युअर आणि टाटा एआयए प्रीमियर पेन्शन सिक्युअर अंतर्गत सादर केला जाईल. त्यामुळे पॉलिसीधारकांना शिस्तबद्ध, बाजाराशी संलग्न चौकटीत निवृत्ती निधी तयार करता येईल.

 

 

 

टाटा एआयए आपल्या पॉलिसीधारकांच्या बदलत्या गरजांना अनुरूप शिस्तबद्ध फंड व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक संधी देण्यास कटिबद्ध आहे. कंपनीने वेगवेगळ्या कालावधीत आपल्या फंडांशी संबंधित बेंचमार्कपेक्षा चांगला परतावा देत मजबूत कामगिरीचा इतिहास निर्माण केला आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत, टाटा एआयए लाइफच्या रेटेड अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंट^ (AUM) पैकी 95% पेक्षा अधिक मालमत्तेला जागतिक रेटिंग एजन्सी मॉर्निंगस्टारकडून 4 किंवा 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

 

 

 

टाटा एआयए फंड्सची मजबूत कामगिरी

 

मागील 5 वर्षांचा परतावा* (CAGR)

 

टाटा एआयए फंड्स

 

फंड परतावा(%)*

 

बेंचमार्क परतावा(%)*

 

मल्टी कॅप फंड

 

23.21%

 

16.65%

 

टॉप 200 फंड

 

24.08%

 

16.65%

 

इंडिया कंझम्प्शन फंड

 

23.85%

 

16.65%

 

*डेटा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत. मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही.

 

मल्टी कॅप फंड, इंडिया कंझम्प्शन फंड, टॉप 200 फंड: S&P BSE 200.

 

सुरु झाल्याचा दिनांक: टॉप 200 फंड: 12 जानेवारी 2009, मल्टी कॅप फंड: 05 ऑक्टोबर 2015, इंडिया कंझम्प्शन फंड: 05 ऑक्टोबर 2015.

 

टाटा एआयएने आपल्या अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये (व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता) लक्षणीय वाढ करत ते 141,656 कोटी रु. (30 नोव्हेंबर 2025) पर्यंत नेले आहे. यात वार्षिक आधारावर 20.85% वाढ दिसून आली आहे. ही वाढ मजबूत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न आणि उत्कृष्ट गुंतवणूक कामगिरीमुळे शक्य झाली आहे.

 

*टीप: फंडाचा जोखीम स्तर उच्च असल्याने गुंतवणूकदारांनी आपली जोखीम क्षमता काळजीपूर्वक तपासावी. मागील कामगिरी भविष्यातील निकालांची हमी देत नाही.

 

*© 2024 Morningstar. सर्व हक्क राखीव. Morningstar हे नाव भारतात आणि इतर न्यायविभागांमध्ये Morningstar, Inc. चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. येथे समाविष्ट केलेली माहिती:

(1) Morningstar, Inc. आणि त्याच्या संलग्न कंपन्यांची मालकीची माहिती. त्यात Morningstar India Private Limited (“Morningstar”) यांचा अमर्यादित समावेश आहे; (2) Morningstar यांच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे, पूर्ण किंवा अंशतः, कॉपी केली जाऊ शकत नाही, पुन्हा वितरित केले जाऊ शकत नाही किंवा वापरली जाऊ शकत नाही; (3) संपूर्ण, अचूक किंवा वेळेवर उपलब्ध असेल याची हमी दिलेली नाही; आणि (4) विविध तारखांना प्रकाशित झालेल्या आणि विविध स्रोतांकडून प्राप्त केलेल्या डेटावर आधारित असू शकते; आणि (5) कोणतीही सिक्युरिटी किंवा इतर गुंतवणूक साधन खरेदी किंवा विक्री करण्याचा प्रस्ताव म्हणून समजला जाणार नाही. Morningstar, Inc., त्याच्या कोणत्याही संलग्न कंपन्या (यामध्ये, मर्यादित नसलेल्या स्वरूपात, Morningstar चा समावेश आहे) किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकारी, संचालक, कर्मचारी, सहकारी किंवा प्रतिनिधीं पैकी कुणीही येथे दिलेल्या माहितीद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या उद्भवणाऱ्या कोणत्याही ट्रेडिंग निर्णयांसाठी, नुकसानीसाठी किंवा इतर हानीसाठी जबाबदार राहणार नाही.

 

 

 

**टाटा एआयए मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज फंड (SFIN:ULIF09531/12/25MUF110) | टाटा

एआयए मल्टिकॅप ऑपर्च्युनिटीज पेन्शन फंड (SFIN:ULIF09631/12/25MUP110)

 

 

About Tata AIA Life

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments