वास्तविक जीवनातील स्थिरता व परिवर्तनाच्या गाथांचे सर्वोत्तम कलेक्शन ‘द लाइट दॅट लिव्ह्ज ऑन’चे अनावरण केले
पुण्यामध्ये फाऊंडेशनच्या संपूर्ण भारतातील साजरीकरणाच्या समापन समारोहाचे आयोजन करण्यात आले, जेथे देशातील उत्तम कामगिरीची २० वर्षे साजरी करण्यात आली
पुणे, डिसेंबर 19, 2025 – कॉग्नीझण्ट फाऊंडेशन इंडियाने पुण्यातील कॉग्नीझण्ट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स इंडिया (डेक्क्न कॅम्पस) येथे विशेष समारोहाचे आयोजन करत देशातील परिवर्तनात्मक सामाजिक प्रभावाची २० वर्षे साजरी केली. या समारोहामध्ये ३०० हून अधिक व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली, ज्यामध्ये सहयोगी एनजीओ, कॉग्नीझण्ट प्रमुख, सहकारी, कॉग्नीझण्ट आऊटरिचचे स्वयंसेवक आणि प्रमुख भागधारकांचा समावेश होता. या समारोहामध्ये फाऊंडेशनच्या सहयोग, नाविन्यता आणि दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाच्या अविरत वारसाला साजरे करण्यात आले.
या समारोहाचे खास आकर्षण होते स्मरण पुस्तक ‘द लाइट दॅट लिव्ह्ज ऑन’चे अनावरण, ज्यामध्ये व्यक्तींच्या वास्तविक जीवनातील गाथांचा समावेश आहे, ज्यांच्या जीवनावर फाऊंडेशनच्या शिक्षण, आरोग्यसेवा व उदरनिर्वाहामधील उपक्रमांचा सकारात्मक प्रभाव पडला आहे. या प्रबळ गाथांमधून परिवर्तनात्मक बदल निदर्शनास येतो, जो समुदाय, तंत्रज्ञान व उद्देशपूर्ण कृती एकत्र आल्यास होऊ शकतो.
”वास्तविक परिवर्तन रातोरात होत नाही, त्यासाठी सर्वांनी समान उद्देशासह एकत्र आले पाहिजे आणि दीर्घकाळापर्यंत कटिबद्ध राहिले पाहिजे,” असे कॉग्नीझण्ट फाऊंडेशनचे संचालक कस्तुरी बालाजी म्हणाले. ‘कॉग्नीझण्ट फाऊंडेशन हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ओळखली जाते, जेथे ते दोन दशकांपासून आरोग्यसेवा, शिक्षण आणि उदरनिर्वाहासंदर्भात उपक्रमांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याप्रती समर्पित आहे. यंदाची थीम ‘सर्वसमावेशक शिक्षण, सक्षम भविष्य’ फक्त विधान नसून प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करते.”
पुण्यामध्ये या विशेष समारोहाच्या आयोजनासह फाऊंडेशनच्या भारतभरातील २०वा वर्धापन दिन साजरीकरणाचे यशस्वी समापन झाले आहे, जेथे चेन्नईपासून सुरू होऊन गुरूग्राम व बेंगळुरूमध्ये साजरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या साजरीकरणामध्ये कंपनीच्या दोन दशकांच्या प्रबळ प्रभावाला प्रशंसित करण्यात आले, ज्यादरम्यान कॉग्नीझण्ट फाऊंडेशनने ३०० हून अधिक एनजीओ सहयोगींसोबत सहयोगाने ६०० हून अधिक प्रकल्प राबवले, ज्यांनी भारतभरातील लाखो व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.
”’द लाइट दॅट लिव्ह्ज ऑन’ स्मरण पुस्तक असण्यासोबत त्यामधून आमचा समान उद्देश व प्रगती दिसून येते,” असे कॉग्नीझण्टचे भारत व एपीएसीमधील जनरल कौन्सुल आणि कॉग्नीझण्ट फाऊंडेशनचे संचालक नारायणन टी. म्हणाले. ”आजच्या अनावरणासह आम्ही सर्वसमावेशक भविष्य घडवण्याप्रती, तसेच आम्ही प्रशंसित करत असलेल्या गाथा सतत प्रेरित करत राहतील याची खात्री घेण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.”
या समारोहामध्ये व्यक्तींच्या प्रेरणादायी वैयक्तिक गाथा सादर करण्यात आल्या, ज्यांच्या जीवनावर फाऊंडेशनच्या उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे.
विशेष समारंभ ‘सेलिब्रेटिंग शेअर्ड इम्पॅक्ट’सह या समारोहाची सांगता झाली, जेथे सहयोगी एनजीओ आणि एजन्सी सहयोगींचा समान व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याप्रती फाऊंडेशनच्या मिशनमध्ये उल्लेखनीय योगदान देण्यासाठी सन्मान करण्यात आला. सहभाग घेतलेल्या संस्था पुढीलप्रमाणे:
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन, ब्राइट फ्युचर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, वाय४डी फाउंडेशन, कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट, हैदराबाद आय इन्स्टिट्यूट (एलव्ही प्रसाद), पीबीएमएचे एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, पुणे, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, शंकरा ज्योती आय इन्स्टिट्यूट, एसजीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लोक भारती एज्युकेशन सोसायटी, मुक्तांगण एज्युकेशन ट्रस्ट, हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डिफ अँड डिफब्लाइंड, रूम टू रीड इंडिया ट्रस्ट आणि विज्ञानवाहिनी, सोलएस, एसजीएस, अॅड्सविटा, शोबिज, एव्हियन वी.
प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित होते, जसे कॉग्नीझण्टचे भारत व एपीएसीमधील जनरल कौन्सुल व कॉग्नीझण्ट फाऊंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य नारायणन टी., कॉग्नीझण्ट फाऊंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य कस्तुरी बालाजी आणि कॉग्नीझण्टच्या आयओटी प्रॅक्टिसचे ग्लोबल डिलिव्हरी हेड अभिजीत
दातार.


