Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोटोहाऊसचा पुण्यात विस्तार – स्वारगेट येथे नवीन डीलरशिप, बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू

मोटोहाऊसचा पुण्यात विस्तार – स्वारगेट येथे नवीन डीलरशिप, बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू

ऑस्ट्रियाच्या प्रीमियम ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर आता पुणे स्वारगेटमध्ये उपलब्ध

 

26 डिसेंबर 2025 – केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (केव्हीएमपीएल) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोटोहाऊसने कृष्णा मोटो यांच्या सहकार्याने पुण्यात आपली नवीन डीलरशिप सुरू केल्याची घोषणा केली आहे. या विस्तारामुळे भारतात दर्जेदार मोटरसायकल, पेट्रोल स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोटोहाऊसच्या उद्दिष्टाला आणखी बळ मिळाले आहे.

 

आता पुण्यात जागतिक दर्जाचे ब्रँड

 

क्रॉसफायर 500एक्स, क्रॉसफायर 500एक्ससी, क्रॉमवेल 1200, क्रॉमवेल 1200एक्स आणि लवकरच लाँच होणारी स्टॉर 500 या ब्रिक्स्टन मोटरसायकल्सच्या श्रेणी उत्कृष्ट परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि सर्व प्रकारच्या वापरासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या प्रीमियम मोटरसायकल्स अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत डिझाइनचे मिश्रण असून, उत्कृष्ट राइडिंग अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या मोटरसायकल प्रेमींसाठी ती उपयुक्त आहेत.

 

व्हीएलएफ मॉबस्टर 135 पेट्रोल स्कूटर आणि टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर शहरी प्रवासासाठी उपयुक्त, सोयीस्कर आणि आणि पर्यावरणपूरक आहेत. यांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत:

 

हलकी बॉडी

मोबाईल चार्जिंग सुविधा

मोठे टायर्स

काढता येणारी बॅटरी

कॅन्टिलिव्हर सस्पेन्शन

तीन रायडिंग मोड्स आणि सुमारे 150 किमीपर्यंतची रेंज

केव्हीएमपीएल – मोटोहाऊसचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तुषार शेळके म्हणाले : “मोटोहाऊससाठी हा फक्त विस्तार नाही, तर भारतातील रायडिंगचा अनुभव अधिक चांगला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जागतिक दर्जाची टू-व्हीलर्स वाहने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तसेच परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक नवीन डीलरशिपसोबत आम्ही चांगला परफॉर्मन्स, पर्यावरणाची काळजी आणि ग्राहक समाधानाबाबतची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.”

 

प्रीमियम डीलरशिपचा अनुभव

पुण्यातील नवीन डीलरशिपमध्ये 2,000 चौ. फूटचे प्रशस्त शोरूम आणि त्यासोबत 1,000 चौ. फूटचा वर्कशॉप आहे. येथे ग्राहकांना ब्रँडचा सखोल अनुभव घेता येईल तसेच विश्वासार्ह आफ्टर-सेल्स सर्व्हिस मिळेल.

 

· ब्रिक्स्टन मोटरसायकल्स: 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी + 2 वर्षांची एक्स्टेन्डेड वॉरंटी

 

· व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर: 3 वर्षांची वाहन वॉरंटी + 3 वर्षांची बॅटरी वॉरंटी

 

देशभरात जलद विस्तार

मोटोहाऊसचे 2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत मुंबई, चेन्नई, म्हैसूर, रायपूर, जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, जम्मू-काश्मीर आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमध्ये 9 नवीन डीलरशिप्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या वर्षी 5,000 वाहनांची विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

 

आगामी लाँचेस

· नवीन टूरिंग मोटरसायकल – स्टॉर 500: 2026 मध्ये लाँच होणार

 

याशिवाय, या वर्षाच्या शेवटी मोटोहाऊस टूरिंग सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे, ज्यामुळे सर्व सेगमेंटमध्ये कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होईल.

 

किंमती (एक्स-शोरूम, भारत)

· व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर: 1,29,999 रुपये *

 

· व्हीएलएफ मॉबस्टर 135 (पेट्रोल स्कूटर): 1,29,999 रुपये *

 

· ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स आणि 500 एक्ससी: 3,99,999 रुपये पासून

(ही खास ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यंत वैध आहे)

 

· ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200: 8,23,778 रुपये *

 

· ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200एक्स (लिमिटेड एडिशन – फक्त 100 युनिट्स): 9,73,819 रुपये *

 

मोटोहाऊस बद्दल

मोटोहाऊस, केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (केव्हीएमपीएल) द्वारे चालवली जाणारी कंपनी असून, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र करून भारतातील वाहन खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि चांगला बनवते. 1962 मध्ये स्थापन झालेल्या केएडब्ल्यू ग्रुपच्या पाठिंब्याने, मोटोहाऊस आंतरराष्ट्रीय दर्जाचे टू-व्हीलर ब्रँड भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवते. उत्कृष्ट गुणवत्ता, प्रगत तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी सोल्युशन्स हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

 

अधिक माहितीसाठी, भेट द्या:

 

🔗 MotoHaus Website

 

📱 Facebook | LinkedIn | Instagram

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments