Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्वशांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी, पुणेतर्फे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे...

विश्वशांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी, पुणेतर्फे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन सारंग कुलकर्णी व प्रियंका बर्वे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन

 

 

पुणे, दि. २९ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे मंगळवार दि. ३० व बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ पासून विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल राजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संकल्पक व मार्गदर्शक विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे आहेत.

दोन दिवस साजरा होणार्‍या या एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत’ महोत्साचे उद्घाटन दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. सारंग कुलकर्णी व प्रियंका बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी, सुप्रसिद्ध पखवाज वादक पं.उध्दवबापू आपेगावकर, आदिनाथ धुुमाळे, प्रा. शशांक दिवेकर व अदिती रिसवडकर आपली कला सादर करतील.

दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिद्ध व्हायोलियनवादक तेजस उपाध्ये, श्रीमती कल्याणी बोंद्रे आणि सुप्रिसिद्ध गायक श्री. उपेंद्र भट हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरूवात सुप्रसिद्ध शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल.

भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा गुढी पाडवा हाच खर्‍या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि ३१ डिसेंबर दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतुु विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म’, ‘स्वाभिमान’ व ‘स्वत्व’ जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमातून संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती देणारा एक आगळा वेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.

विश्वशांती गुरूकुल येथील विश्वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी ‘श्री महासरस्वती’, ‘श्री महालक्ष्मी’ व ‘श्री महाजलदेवता’ या तीन विशेष मंचावरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

१ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरूण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्ये’चा समारोप ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वतःचे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२६ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.

या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद ब्रह्म स्वरूपी संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती घ्यावी असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड-ढाकणे आणि महासचिव आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments