Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग सीईएसमध्‍ये टेलिव्हिजन्‍सच्‍या मर्यादांना दूर करण्‍यासोबत एआय अप्‍लायन्‍सेन्‍सच्‍या भावी टप्‍प्‍याचे अनावरण करणार:...

सॅमसंग सीईएसमध्‍ये टेलिव्हिजन्‍सच्‍या मर्यादांना दूर करण्‍यासोबत एआय अप्‍लायन्‍सेन्‍सच्‍या भावी टप्‍प्‍याचे अनावरण करणार: जेबी पर्क

सॅमसंग २०२६ मध्‍ये डिवाईस एक्‍स्‍पीरिअन्‍स डिव्हिजनसाठी आपला दृष्टिकोन, तसेच जगातील सर्वात मोठे आयटी व होम अप्‍लायन्‍स प्रदर्शन सीईएसमध्‍ये नवीन एआय-संचालित ग्राहक अनुभव सादर करण्‍यास सज्‍ज आहे.

 

सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्‍हणाले, ”सॅमसंग एआय अप्‍लायन्‍सेस आणखी एका महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यापर्यंत पोहोचत आहेत, जे वैविध्‍यपूर्ण अनुभव देत आहेत, वापरकर्त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनाला अधिक जाणून घेतात आणि दैनंदिन राहणीमान अधिक उत्‍साहित करतात. जगातील सर्वात मोठे ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व आयटी प्रदर्शन सीईएस २०२६ मध्‍ये पुढील टप्‍प्‍याचे अनावरण करण्‍यात येईल. आम्‍ही लास वेगास येथे ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्‍यात येणाऱ्या ‘द फर्स्‍ट लुक’ इव्‍हेण्‍टमध्‍ये टीव्‍हीच्‍या मर्यादांना देखील दूर करणार आहोत.”

 

सीईएसमध्‍ये सॅमसंग होम लिव्हिंगमधील अनेक सुधारणांना दाखवेल, ज्‍यामध्‍ये एआय-समर्थित कस्‍टमाइज्‍ड केअर आणि शक्तिशाली हार्डवेअर-सहाय्यक कार्यक्षमतेचे संयोजन आहे. आम्‍ही स्‍मार्ट फॅब्रिक केअर, सर्वोत्तम तापमान नियंत्रण आणि अधिक सोईस्‍कर क्‍लीनिंग अनुभवांसह आमच्‍या बीस्‍पोक एआय लिव्हिंग अप्‍लायन्‍स लाइनअपमध्‍ये सुधारणा करू, जी वापरकर्त्‍यांच्‍या डिवाईसेसमध्‍ये समन्‍वय राखत त्‍यांच्‍या जीवनशैलीशी जुळून जाण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

सीईएसमध्‍ये प्रदर्शित केल्‍या जाणाऱ्या नाविन्‍यतांमध्‍ये अपग्रेडेड बीस्‍पोक एआय एअरड्रेसर, बीस्‍पोक एआय लॉण्‍ड्री कॉम्‍बो, बीस्‍पोक एआय विंडफ्री प्रो एअर कंडिशनर आणि प्रमुख बीस्‍पोक एआय जेट बोट स्‍टीम अल्‍ट्रा रोबोट व्‍हॅक्‍युम यांचा समावेश आहे.

 

२० वर्षांहून अधिक काळापासून जगातील टेलिव्हिजन्‍समधील आघाडीची सॅमसंग विस्‍तारित मायक्रो आरजीबी टीव्‍ही लाइनअप देखील दाखवेल. नवीन विस्‍तृत श्रेणी सॅमसंगच्‍या मायक्रो आरजीबी डिस्‍प्‍ले तंत्रज्ञानाच्‍या भावी उत्‍क्रांतीला सादर करते, ज्‍यासह प्रीमियम घरगुती मनोरंजनासाठी नवीन मानक स्‍थापित करत आहे.

 

सॅमसंग नवीन बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर फॅमिली हब देखील सादर करेल, जे अपग्रेडेड एआय व्हिजनसह सुसज्‍ज आहे. वैशिष्‍ट्यामधील प्रमुख अपग्रेड म्‍हणजे गुगल जेमिनीसह डिझाइन करण्‍यात आलेले फंक्‍शन्‍स, जेथे पहिल्‍यांदाच रेफ्रिजरेटरमध्‍ये या वैशिष्‍ट्याची भर करण्‍यात आली आहे.

 

अपग्रेडेड एआय व्हिजनसह सॅमसंग रेफ्रिजरेटर्स अधिक निपुणपणे खाद्यपदार्थ ओळखतात आणि किचन अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात. यापूर्वी रेफ्रिजरेटर्स जवळपास ३७ प्रकारचे फ्रेश फूड आणि डिवाईसवर आधीच नोंदणी केलेल्‍या ५० प्रकारच्‍या प्रोसेस फूडला ओळखू शकत होते. सीईएसमध्‍ये अनावरण करण्‍यास सज्‍ज असलेले नवीन व्‍हर्जन विद्यमान मर्यादांना दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ते अधिक खाद्यपदार्थ ओळखू शकतात, ज्‍यामधून सर्वसमावेशक व स्थिर अनुभव मिळेल.

 

श्री. पर्क म्‍हणाले की, सॅमसंगचे भारतात १०,००० हून अधिक तज्ञ इंजीनिअर्स कार्यरत आहेत, जे एआय परिवर्तनामध्‍ये सामील आहेत, ज्‍यामुळे ब्रँडने पुढील ३० वर्षांसाठी आपला दृष्टिकोन स्‍थापित केला आहे.

 

ते पुढे म्‍हणाले, ”आमचे भारतात तीन आरअँडडी सेंटर्स असण्‍यासोबत डिझाइन सेंटर आहे, जे भारतातील नाविन्‍यतांमध्‍ये, तसेच जागतिक उत्‍पादने व तंत्रज्ञानामध्‍ये देखील योगदान देते. माझा विश्वास आहे की, आम्‍ही स्‍मार्ट होम्‍स, कनेक्‍टेड लिव्हिंग आणि एआयद्वारे संचालित सर्वोत्तम डिवाईसेसवर लक्ष केंद्रित करत असताना भारत जागतिक नाविन्‍यतांचे नेतृत्‍व करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”

 

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments