Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने 'आयसीआयसीआय प्रू वेल्थ फॉरेव्हर' सादर केले – सुलभ वारसा...

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने ‘आयसीआयसीआय प्रू वेल्थ फॉरेव्हर’ सादर केले – सुलभ वारसा नियोजनासाठी उत्तम पर्याय

99व्या वर्षांपर्यंत जीवन संरक्षणाची सोय

 

· वारसा नियोजन – नॉमिनीजना त्रासमुक्त आणि करमुक्त संपत्तीचे हस्तांतरण

 

· पॉलिसीच्या 3 वर्षांनंतर आरोग्य तपासणीची मोफत सुविधा देते

 

 

 

मुंबई, 30 डिसेंबर, 2025: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ‘आयसीआयसीआय प्रू वेल्थ फॉरेव्हर’ ही एक नवीन योजना सादर केली आहे. जे एक सोपे आणि कराच्या दृष्टीने पुढील पिढीसाठी उत्तम वारसा नियोजन प्रदान करेल. आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा देऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे उत्पादन तयार केले आहे.

 

 

 

ही पॉलिसी घेणारा ग्राहक 99 वर्षांचा होईपर्यंत जीवन विम्याची रक्कम दरमहा वाढतच राहते. दरम्यानच्या काळात दुर्दैवाने ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, जीवन विम्याची संपूर्ण रक्कम, जी करमुक्त असते, ती नॉमिनींना दिली जाईल. आयसीआयसीआय प्रु वेल्थ फॉरेव्हर हे ग्राहकांना एक सोपा आणि पुढील पिढीसाठी योग्य नियोजन करण्यासाठी उत्तम उपाय देण्यासाठी खास तयार केले आहे. पॉलिसीच्या मुदतीपर्यंत जर ग्राहक हयात राहिला, तर भरलेले सर्व प्रीमियम परत केले जातात.

 

 

 

उदाहरणार्थ, एका 55 वर्षीय व्यावसायिकाने या पॉलिसीमध्ये सात वर्षांसाठी दरवर्षी 30 लाख रुपये गुंतवल्यास, त्याला 1.5 कोटी रुपयांपासून सुरू होणारे आणि सतत वाढत जाणारे जीवन विमा संरक्षण मिळू शकते. पॉलिसीधारकाचा 85व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला करमुक्त लाभ म्हणून 10 कोटी रुपये मिळतील, ज्यामुळे त्या व्यावसायिकाचा वारसा जपला जाईल आणि कुटुंबाला आर्थिक सातत्य मिळेल.

 

 

 

या योजनेची घोषणा करताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य उत्पादन अधिकारी श्री. विकास गुप्ता म्हणाले, “वाढते उत्पन्न आणि आयुर्मान यामुळे सगळ्यांनाच वारसा नियोजनाचे महत्त्व कळायला लागले आहे. आयसीआयसीआय प्रू वेल्थ फॉरेव्हर सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे, जी ग्राहकांना त्यांची भविष्यातील नियोजनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.”

 

 

 

या योजने अंतर्गत दिले जाणारे लाइफ कव्हर हे वयाच्या 99 व्या वर्षापर्यंत वाढतच जाते. ग्राहकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास जीवन कव्हरची रक्कम करमुक्त लाभ म्हणून दिली जाते. यामुळे पुढील पिढीला संपत्तीचे अखंड हस्तांतरण प्रभावीपणे करणे सोपे होते आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. याशिवाय, मोफत आरोग्य तपासणीची या योजनेतील तरतूद ग्राहकांना त्यांच्या आरोग्याचे सातत्यपूर्ण परीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास सक्षम करते.

 

 

 

ग्राहकांना आम्ही दिलेली वचने पाळण्याची आमची वचनबद्धता 2026 च्या पहिल्या सहामाहीतील आकडेवारीतूनच दिसून येते. आमचा क्लेम निकाली काढण्याचे प्रमाण हे 99.3% एवढे, म्हणजेच या व्यवसायातील सर्वोत्तम आहे. चौकशीची गरज नसलेल्या दाव्यांसाठी सरासरी टर्नअराउंड टाइम 1.1 दिवस आहे. ही प्रक्रिया सुव्यवस्थित आहे जी जलद आणि त्रास-मुक्त दाव्याचे पेआउट सक्षम करतात.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments