Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविद्यालयीन तरुणांसह चार्लीने दिला 'दारू नको दूध प्या संदेश' आनंदवन व्यसनमुक्ती...

महाविद्यालयीन तरुणांसह चार्लीने दिला ‘दारू नको दूध प्या संदेश’ आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने आयोजन

पुणे: दारू नको दूध प्या’, ‘मानवतेचा बोध घ्या बाटली फोडा, दूध जोडा…’, ‘दारूचा पाश जीवनाचा नाश’, ‘दारू सोडा आनंद जोडा’ अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने, चार्लीच्या वेशातील कलाकारासह जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे, असा संदेश देत दूधवाटप करण्यात आले.

 

डेक्कनजवळील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, आपलं फाउंडेशन, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि कात्रज डेअरी यांच्यातर्फे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, निलेश शिंदे, राहुल बोंम्बे, अनुपकुमार कुंडीतकर, संतोष पटवर्धन, दत्तात्रय सोनार, ऋषिकेश इंगळे, विशाल शिंदे, कृष्णा भताने, कात्रज डेअरीचे अनिल ठोंबरे, तुषार पिंगळे, मराठवाडा मित्र मंडळ चे प्रा. दशरथ गावित, फाउंडेशनचे मनीष भोसले, रजत श्रीवास्तव, ओंकार बेहरिया, गौरव खरात, सोहम काळ, वरद वाळुंज, उत्कर्ष जाधव व विद्यार्थी उपस्थित होते. यंदा उपक्रमाचे १७ वे वर्ष होते.

 

 

डाॅ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments