Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत   अडवाणी सुपर किंग्ज आणि झिंगर्स संयुक्तपणे...

पूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत   अडवाणी सुपर किंग्ज आणि झिंगर्स संयुक्तपणे आघाडीवर

 

 

पुणे: ड्युकाटी मोटर्स प्रस्तुत पूना क्लब गोल्फ लीग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवसानंतर, शनिवारी अडवाणी सुपर किंग्ज (गट अ) आणि झिंगर्स (गट ब) यांनी संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. ही स्पर्धा पूना क्लब गोल्फ कोर्सवर,

 

दोन्ही संघांनी दोन सामन्यांमधून प्रत्येकी २४.५ गुण मिळवले आहेत. त्यामुळे प्लीज स्पर्धेतील उत्कंठा वाढली आहे. ‘अ’ गटात जग्वार्स संघाने आपल्या पहिल्याच फेरीत १८ गुण मिळवून दमदार सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ शुभान सनरायझर्स संघाने २४ गुण मिळवत आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. या गटातील इतर संघांमध्ये मानव परी पिन सीकर्स (१० गुण), ऑटोमेक बेकर्स (११ गुण), विजय अडवाणी आणि महिंद्रा लुल्ला फेअरवे टायटन्स (९.५ गुण), शिर्के बर्डीज बँडिट्स (८ गुण) यांचा समावेश होता, तर अडवाणी सुपर किंग्सने दुसऱ्या दिवशी ११.५ गुणांची भर घातली.

 

‘ब’ गटामध्ये, झिंगर्स संघाने दमदार कामगिरी करत आपली आघाडी कायम राखली, तर तेजोमय स्टार्स २३.५ गुणांसह त्यांच्या अगदी जवळ पोचले आहेत. मॅव्हरिक्स संघाने २० गुण मिळवले, त्यानंतर हेलिओस ईगल्स (१७ गुण), इव्हेंट डायनॅमिक्स (१६ गुण), वास्कॉन पूना लायन्स (१४ गुण), आणि जॉय-एन-क्रू चॅलेंजर्स (११ गुण) यांचा क्रमांक लागतो.

 

दोन्ही गटांमध्ये गुणतालिकेतील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे, येत्या काही दिवसांत चॅम्पियनशिपमध्ये चुरशीची स्पर्धा आणि रोमांचक गोल्फ लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments