एआय, वापरकर्त्यांचा अभिप्राय आणि सहयोगींच्या डेटाचा वापर करत प्लॅटफॉर्म प्रमुख सुरक्षितता व विश्वासाशी संबंधित संकेत अधिक स्पष्टपणे सादर करत आहेत, ज्यामुळे महिला आत्मविश्वासाने त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतात
गुरूग्राम, जानेवारी १८, २०२६: मेकमायट्रिप ही भारतातील आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीचा वापर करून महिला प्रवाशांना हॉटेल्स आणि इंटरसिटी बस बुकिंगसाठी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करत आहे. प्लॅटफॉर्मवर दिसण्यात आलेल्या वर्तणूकीच्या आधारे हा दृष्टिकोन विकसित करण्यात आला आहे. यामधून निदर्शनास येते की, महिला पर्यटक बुकिंग करण्यापूर्वी विचारपूर्वक माहिती तपासतात. त्या इतर प्रवाशांनी व्यक्त केलेले अनुभव पाहतात, हॉटेलचे लोकेशन व आजुबाजूच्या परिसराची सुरक्षितता जाणून घेतात आणि इतर पर्यटकांनी अपलोड केलेल्या फोटोंची बारकाईने पाहणी करतात.
बुकिंग करताना सुरक्षिततेबामहच्या पैलूंना अधिक प्राधान्य दिले जात आहे. पुरूषांच्या तुलनेत महिला किमान १५ दिवस अगोदर बुकिंग करण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर प्रीमियम व ब्रॅण्डेड प्रॉपर्टीजना प्राधान्य देण्याचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत १६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महिला पर्यटक प्रथम श्रेणीच्या शहरांपासून तृतीय श्रेणीच्या शहरांपर्यंत बुकिंग करताना हा ट्रेण्ड प्रकर्षाने दिसून येतो, जेथे तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये देखील ब्रँडेड हॉटेल्समधील स्टे सुरक्षिततेची खात्री देतात, असे मानले जाते. इंटरसिटी बस बुकिंगसंदर्भात एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला बाजूला इतर महिला प्रवासी असतील, अशा बुकिंग्जना प्राधान्य देतात.
एखादी महिला हॉटेलमधील स्टेचे नियोजन करते तेव्हा प्लॅटफॉर्म सुरक्षिततेसंदर्भात प्रमुख बाबींना निदर्शनास आणते. यामध्ये महिलांनी दिलेल्या रेटिंग्ज दाखवल्या जातात. एआयच्या माध्यमातून तयार केलेले सारांश हॉटेलमध्ये स्टेबाबत शोध घेत असताना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वर्तणूक आणि त्या ठिकाणची सुरक्षितता याबाबत माहिती देतात. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष सुविधा जसे सीसीटीव्ही, डोअर आय, डोअर चेन्स आणि मोठे आरशे यांची माहिती स्पष्टपणे दिली जाते, ज्यामुळे महिला पर्यटकांना हॉटेलमधील सुरक्षिततेबाबत जाणून घेण्यास मदत होते. महिला पर्यटक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या स्ट्रीट व्ह्यू पर्यायाचा देखील वापर करू शकतात, ज्यामुळे त्यांना बुकिंगबाबत निर्णय घेण्यापूर्वी हॉटेलच्या आजुबाजूचे रस्ते व मार्ग पाहता येतील.
इंटरसिटी बस प्रवासासाठी याच दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे. एआय प्रवासादरम्यान महिलांना प्रवासाबाबत दिलेल्या अभिप्रायांना शोधून काढते आणि वेळेचे पालन, सुरक्षितता व स्वच्छता यांसारख्या प्रमुख बाबींनुसार अभिप्रायांना वेगळे करते. प्रत्येक वैशिष्ट्याला सेंटिमेंट टॅग दिला जातो, ज्यामुळे महिलांना त्वरित अभिप्राय उपलब्ध होतो आणि अधिक आत्मविश्वासाने बुकिंगसंदर्भात निर्णय घेता येतो. महिला डबल बर्थमधील एका बर्थचे तिकिट बुक करते तेव्हा दुसर्या बर्थचे तिकिट आपोआपपणे फक्त महिलेसाठी आरक्षित केले जाते, ज्यामुळे पुरूषासोबत प्रवास करण्याची शक्यता टाळली जाते. ही सुविधा रात्रभर किंवा लांबच्या प्रवासादरम्यान महिलेच्या सुरक्षिततेची खात्री देते.
मेकमायट्रिपचे सह-संस्थापक व गुप सीईओ राजेश मागोव म्हणाले, ”महिला त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना अधिक काळजी घेतात. यामधून त्या हॉटेल स्टे व प्रवास बुकिंगचे विचारपूर्वक करणारे मूल्यांकन दिसून येते. आम्ही त्यांच्यासाठी ही ट्रिप नियोजन प्रक्रिया अधिक सोपी करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेथे आमच्या संपन्न डेटा व एआयचा वापर करत आहोत, ज्यामुळे महिला माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.”
यामध्ये दोन स्तरांवर प्रयत्न केले जातात. पहिले म्हणजे एआयचा वापर करत लाखो रिव्ह्यूंमधून आणि वापरकर्त्यांनी दिलेल्या संकेतांमधून माहिती दिली जाते, ज्यामुळे महिला पर्यटकांना त्यांचे हॉटेल स्टे व प्रवास बुकिंगचे मूल्यांकन करण्यास मदत होते. दुसरे म्हणजे जवळपास ९७,०००. निवास मालमत्ता (हॉटेल्स) आणि ३५०० हून अधिक इंटरसिटी बस ऑपरेटर्सकडून माहिती मिळवली जाते, ज्यामध्ये मुलभूत सुविधा, सुरक्षितता आणि कामकाज पद्धतींचा समावेश असतो. एकत्रित या सुविधा प्रबळ पाया निर्माण करतात, जेथे महिला सुरक्षिततेसह त्यांच्या बुकिंगचे पर्याय स्पष्टपणे पाहू शकतात.


