Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedआसाममध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा पुण्यातील शिल्पकार विराज विवेक खटावकर...

आसाममध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा पुण्यातील शिल्पकार विराज विवेक खटावकर यांनी साकारला शिवरायांचा पुतळा ; २१ पॅरा स्पेशल फोर्स २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशन यांचा पुढाकार

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सात फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा आसाम मधील जोराहाट येथे उभारण्यात येणार आहे. २१ पॅरा स्पेशल फोर्स २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशन यांच्या पुढाकाराने आसाममध्ये पुतळा उभारण्यात येत आहे. विधीवत पूजन करुन पुण्यातून हा पुतळा रवाना झाला असून दिनांक २९ मार्च रोजी जोराहाट येथे पुतळ्याची स्थापना आणि पूजन करण्यात येणार आहे.

नऱ्हे येथील शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर गोविंद इलंगोवन, ब्रिगेडियर पी. टी. घोगले, कर्नल एस. राजगोपाल, कॅप्टन स्वामीनाथन, मेजर बी. धामणकर, कर्नल एच.डी. खांडगे, कर्नल संभाजी पाटील, कर्नल राजगोपालन आदी उपस्थित होते.

समितीचे समितीचे सुभेदार गोरख धमक, अध्यक्ष सुभेदार मेजर बाळू मोहारे, उपाध्यक्ष हवालदार पांडुरंग गोविंद आंब्रे, सचिव हवालदार संतोष चौधरी, खजिनदार सुभेदार नंदकुमार घोरपडे, हवालदार कल्याण माने, हवालदार जयवंत टकले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा पुतळा शिल्पकार विराज विवेक खटावकर या तरुण शिल्पकाराने दोन महिन्यांमध्ये साकारला आहे. २१ वाघनखं परिवारच्या सर्व कमांडोज व परिवारने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. प्रख्यात शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, विपुल खटावकर यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले.

विराज खटावकर म्हणाले, जोराहाट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एपॉक्सी व पॉलिस्टर रेसिंगमध्ये तयार करण्यात आला आहे. त्याचे वजन २५० किलो असून त्यामध्ये रिंन्फोर्समेंटसाठी एमएस चा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यावर अफजल खान वधाचे चार फुटाचे म्युरल, चार बाय चार फुटांची राजमुद्रा आणि तीन बाय दोन आकाराचे वाघ नखाचे म्युरल बसविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments