Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात मतदान जनजागृतीबाबत विविध स्पर्धांचे आयोजन

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात मतदान जनजागृतीबाबत विविध स्पर्धांचे आयोजन

**

पुणे, दि. ६ : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ईव्हीएम मशीन की बॅलेट पेपर’ या विषयावर वादविवाद स्पर्धा तर ‘मेरा पहेला वोट देश के नाम’ या विषयावर चित्रकला या मतदान जनजागृतीच्या स्पर्धांचे आयोजन सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त सहायक मतदान नोंदणी अधिकारी रवी कंधारे यांनी केले. दोन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, समाज सेवक पांडुरंग महाडिक, स्वीप समन्वयक दिपक कदम, सागर काशिद, सीओईपी युवा संसदचे अध्यक्ष स्वप्नील क्षीरसागर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रीतम शेलमोलकर व अमृता देशपांडे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments