Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताच्या अर्थनीतीवर  राम भोगले यांचे व्याख्यान 

भारताच्या अर्थनीतीवर  राम भोगले यांचे व्याख्यान 

 

 

 

पुणे – देशाची अर्थनीती बिघडली की तो देश इतरांचा दास होतो आणि अर्थकारण बळकट असेल तर तो इतरांना दास बनवू शकतो हे नेहमीच प्रत्ययाला येतं. भारताने गेल्या काही वर्षात फार मोठी आर्थिक झेप घेतली आहे. ज्यांना ही प्रगती पाहवत नाही अशा शक्ती त्यात बाधा आणत आहेत. त्यातूनच टॅरीफ आणि निर्बंधांसारख्या कारवाया केल्या जात आहेत. आर्थिक क्षेत्रातील या उतार चढावांचा अभ्यासपूर्ण वेध घेत नव्या भारताच्या अर्थनीतीचं वेगळेपण सांगणार आहेत प्रसिध्द उद्योगपती राम भोगले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे – “ नव्या भारताची अर्थनीती , थोडी आगळी – जगावेगळी.”

 

रा. स्व. संघाची अरण्येश्वर प्रभात शाखा आणि विद्या विकास विद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृति व्याख्यानमालेचं हे पाचवं पुष्प रविवार, दि. १ मार्चला गुंफलं जाणार आहे.

 

स्थळ – विद्या, विकास विद्यालय, सहकारनगर , पुणे.

 

वेळ सायंकाळी ६ वाजता.

 

व्याख्यानासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

 

——————————————————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments