Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedहाय राईज रिटेनिंग वॉल’च्या नव्या पद्धतीला पेटंट

हाय राईज रिटेनिंग वॉल’च्या नव्या पद्धतीला पेटंट

पुणे : उंच इमारतींच्या बांधकामामध्ये जमिनीचा दाब नियंत्रित करण्यासाठी आणि बांधकामाची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हाय राईज रिटेनिंग वॉल अँड अ मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द सेम’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनाचे पेटंटधारक म्हणून मल्हार विकास पाटील आणि वैशाली विकास पाटील यांची नोंद करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार या शोधासाठी पेटंट क्रमांक 600147 देण्यात आला असून, पेटंट कायद्यातील तरतुदींनुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 ऑगस्ट 2026 रोजी या पेटंटला मंजुरी देण्यात आली.
उंच बांधकामांसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना
‘Retaining Wall’ म्हणजे माती, भराव अथवा जमिनीच्या दाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी उभारण्यात येणारी संरचना. उंच इमारती, उताराची जमीन, खोल पाया, बेसमेंट तसेच विविध प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अशा संरचनांना विशेष महत्त्व असते. विशेषतः वाढत्या शहरीकरणामुळे मर्यादित जागेत उंच बांधकामे करण्याचे प्रमाण वाढत असताना जमिनीची स्थिरता आणि बांधकामाची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘High Rise Retaining Wall’ आणि त्याच्या बांधकामाची पद्धत यासंदर्भातील या शोधाला मिळालेले पेटंट बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पेटंटमुळे या विशिष्ट संकल्पनेला आणि तिच्या बांधकाम पद्धतीला बौद्धिक संपदा संरक्षण प्राप्त झाले आहे.

२० वर्षांसाठी पेटंट संरक्षण…
पेटंट प्रमाणपत्रातील नोंदीनुसार या शोधासाठी पेटंटचा कालावधी 5 ऑगस्ट 2023 पासून 20 वर्षांचा आहे. पेटंट मंजूर झाल्यामुळे संबंधित पेटंटधारकांना या शोधाच्या वापरासंदर्भात पेटंट कायद्यानुसार मिळणारे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात या तंत्रज्ञानाचा बांधकाम क्षेत्रात वापर, विकास किंवा व्यावसायिक स्वरूपात विस्तार करण्यासाठी या पेटंटचे महत्त्व वाढू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments