Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुढील तीन ते चार वर्षात उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित - बाबा...

पुढील तीन ते चार वर्षात उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित – बाबा कल्याणी

पुणे,27 फेब्रुवारी 2026 : भारत एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे,असे मत भारत फोर्ज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.

 

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) परिषदेच्या दुसऱ्या दिवशी फायरसाईड चॅट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एशिया इकोनॉमिक डायलॉग 2026 चे संयोजक ॲम्बेसिडर गौतम बंबावाले (निवृत्त) व पीआयसीचे माजी संचालक मेजर जनरल नितीन गडकरी (निवृत्त) यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतरचा प्रवास सांगत संरचनात्मक बदल आणि सुधारणांचा आढावा घेत बाबा कल्याणी म्हणाले की, पुढील तीन ते चार वर्षात संरक्षण उत्पादनासह एकंदर उत्पादन क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा वाढीचा दर आपण कायम राखला पाहिजे.उत्पादन क्षेत्रात विस्तार झाला पाहिजे.सध्या आपले उत्पादन क्षेत्र जीडीपीच्या साधारण 15.5 टक्के आहे आणि 2047 पर्यंत 25 टक्क्यांपर्यंत न्यायचे असेल तर संशोधन व विकास आणि स्वदेशी तंत्रज्ञानात गुंतवणूक गरजेची आहे.आपण आपले तंत्रज्ञान आणि बौध्दिक संपदा (आयपी) निर्माण करण्याची गरज आहे.हे करत असताना आपल्याला स्वत:चे एआय मॉडेल व कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आ

हे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments