Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॉलिवूड आयकॉन माधुरी दीक्षित यांच्या हस्ते पुण्यातील निगडी येथील 'पीएनजी ज्वेलर्स'च्या नवीन...

बॉलिवूड आयकॉन माधुरी दीक्षित यांच्या हस्ते पुण्यातील निगडी येथील ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या नवीन दालनाचे उद्घाटन

पुणे, ८ मार्च २०२४ : १९२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे निगडी प्राधिकरण येथे आपले नवीन दालन सुरू करण्यात आले आहे. २८०० चौरस फूट या भव्य दालनाच्या शुभारंभाला बॉलीवूडची प्रतिष्ठित अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, पुणे शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, ‘पीएनजी ज्वेलर्स’ परिवाराचे सदस्य आणि ब्रँडचे चाहते उपस्थित होते.

२८०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या, निगडी येथील दालनाचे उद्दिष्ट पिंपरी चिंचवड परिसरातील वाढत्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे आहे. हा धोरणात्मक विस्तार निष्ठावंत ग्राहकांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि पीएनजी ज्वेलर्सच्या अद्वितीय खरेदीचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.

परंपरेत सखोल रुजलेल्या डिझाईन्स बरोबर समकालीन डिझाइन्सचा अंगीकार करताना या दालनात बारकाईने तयार केलेली रचना, ब्रँडची मूळ मूल्ये, महाराष्ट्राचा वारसा आणि कलात्मकता अनुभवायला मिळेल. या नवीन दालनामध्ये पारंपरिकपासून ते समकालीन आणि आधुनिक डिझाईन्स प्रत्येक समारंभ, प्रसंगाला पूरक असे दागिन्यांचे विस्तृत कलेक्शन उपलब्ध आहे. निगडी येथील दालनामध्ये आकर्षक सोन्याच्या दागिन्यांपासून ते नैसर्गिक डायमंड पिसेस आणि उत्कृष्ट चांदीच्या उत्पादनांपर्यंतच्या हजारो डिझाईन्स पाहता येणार आहेत.

ग्राहकांप्रती असणाऱ्या आदराचं आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’ आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना घेऊन आले आहेत. ज्यामध्ये निगडी दालनाला भेट देणाऱ्या ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. ही मर्यादित कालावधीची योजना पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाप्रति पीएनजी ज्वेलर्सची कृतज्ञता दर्शविते.

याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, या उत्साही समुदायाचा अविभाज्य भाग होऊन निगडीमध्ये आपले नवीन दालन सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हा विस्तार आमच्या निष्ठावान ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून वर्षानुवर्षे ग्राहकांकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या विस्ताराने ग्राहकांसाठी सोयीस्कर व दागिने खरेदीचा उत्तम अनुभव देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले आहे. निगडी येथील दालनामध्ये आमचे निष्ठावंत ग्राहक आणि नवीन ग्राहक या दोघांचेही स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाल्या की, निगडी येथील पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाच्या उद्घाटनाचा भाग बनताना मला आनंद होत आहे. आधुनिक डिझाईन्स आत्मसात करताना परंपरा जपण्याची त्यांची बांधिलकी पीएनजी ज्वेलर्सला खऱ्या अर्थाने विशेष बनवते. ब्रँडच्या विस्ताराचा साक्षीदार होणे ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी असून मला खात्री आहे की हे दालन दागिन्यांसाठी आवडीचे ठिकाण बनेल.

नवीन दालनाच्या उद्घाटनाचा भाग म्हणून, ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे आपले बहुप्रतीक्षित ‘ब्रँड अँथम’ सादर करण्यात आले. हे ब्रँड अँथम प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायले आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सादर करण्यात आलेले हे गीत ब्रँडचा गौरवशाली वारसा घडवण्यात अविभाज्य भूमिका साकारणाऱ्या आपल्या प्रिय ग्राहकांना आणि समर्पित कर्मचाऱ्यांना मनापासून प्रदान केलेली कृतज्ञता आहे. वास्तविक हृदयस्पर्शी अनुभवांपासून प्रेरणा घेऊन ज्यांनी ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या प्रवासाला अनेक वर्षांपासून आकार दिला आहे, हे गीत ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या मूल्यांचे आणि अतूट बांधिलकीचे तत्त्व दर्शवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments