Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedधर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन...

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १० : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

नोंदणीसाठी अर्जदाराकडे अनुज्ञप्ती, बॅज, वाहन परवाना, रेशनकार्ड, आधारकार्ड व पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पात्र चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास चालकांना मदत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शनासाठी ०२०-२६०५८०८० हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक-मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments