Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर*

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर*

 

पुणे, दि. १२: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा (जीसीसी-टीबीसी) निकाल ऑनलाईन पद्धतीने परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर १० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.

 

परीषदेमार्फत इंग्रजी ३०, ४० व ५० श.प्र.मि. (शब्द प्रती मिनीट) विषयाची परीक्षा ५ ते १० जानेवारीदरम्यान आणि मराठी, हिंदी ३०, ४० श.प्र.मि. व इंग्रजी ६० श.प्र.मि. या विषयाची परीक्षा ३ ते १७ जानेवारीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

 

या परीक्षेच्या निकालाची ऑनलाईन प्रिंट विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावरुन घेता येईल. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे / गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात येतील. सदरील प्रमाणपत्रांची छपाई करून संस्थांनी विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधीत विद्यार्थ्यास सॉप्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी.

 

परीक्षार्थीने निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात म्हणजेच २० मार्च २०२६ पर्यंत गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात विहीत शुल्कासह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय ६०० रुपये याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, असे परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments