Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized‘मेट्रो सिटी’च्या यांत्रिक जीवनात.. सायकलिंग शारीरिक आरोग्यासाठी वरदान..! - गोपाळदादा तिवारी*

‘मेट्रो सिटी’च्या यांत्रिक जीवनात.. सायकलिंग शारीरिक आरोग्यासाठी वरदान..! – गोपाळदादा तिवारी*

 

‘यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त.. संजय बालगुडे मित्र परिवारतर्फे ‘लोणावळा – पुणे सायकलिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न…!

 

प्रथम विजेता सिध्देश पाटील, द्वितीय हनुमान चोपडे तर तृतीय आयन तांबोळी ..!

पुणे दि १२ मार्च –

‘मेट्रो सिटी’च्या यांत्रिक जीवनात.. सायकलिंग शारीरिक आरोग्यासाठी वरदान असून, सायकलिंग मुळे मन व शरीर तंदुरूस्त रहातात असे वक्तव्य काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त.. ‘लोणावळा – पुणे सायकलिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते, अध्यक्ष स्थानी बालवडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब बालवडकर होते.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर (केंद्र सरकार मधील) सर्वाधिक खाती व जबाबदाऱ्या पेलणारे महाराष्ट्राचे १ले मुख्यमंत्री आदरणीय स्व यशवंतरावजी चव्हाण साहेब होते त्यांचा उच्चांक देशातील वा राज्यातील कोणाही नेत्याने अद्याप ओलांडलेला नाही ही प्रत्येक महाराष्ट्रजनांस अभिमानाची बाब आहे. संजय बालगुडे सातत्याने गेली ३७ वर्षे स्व यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा भरवत असल्या बद्दल कौतुक केले.

स्पर्धेचे संयोजक – निमंत्रक काँग्रेस चे सरचिटणीस संजयजी बालगूडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व पुढील वर्षी वहातुक कोंडी च्या त्रासा मुळे शेवटचे गंतव्य (डेस्टीनेशन) भक्ती – शक्ती स्मारक हे असेल असे जाहीर केले.

माजी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांचे जयंती निमित्त ‘काँग्रेस नेते ‘संजय बालगूडे मित्र परीवार’ तर्फे आयोजित लोणावळा – पुणे सायकल स्पर्धा संपन्न झाल्या.

सु ३२ सायकलपटुंनी सहभाग घेतला.

लोणावळा येथून लोणावळा काँग्रेस अध्यक्ष अतुल गवळी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरवात करण्यात आलीं या प्रसंगी लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक आशिष गवळी, सुधीर शिर्के, मोहन औरंगे, प्रकाश रावडे, आकाश परदेशी इ उपस्थित होते. संयोजक संजय बालगुडे यांनी उपस्थितांचे व स्पर्धकाचे स्वागत केले.

६५ किमी अंतरा’च्या जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर कामशेट पर्यंत आयन तांबोळी, वेदांत कुलकर्णी व ऊमेश वंजारा

यांना आघाडी घेतली होती तर तळेगांव च्या पुढे सिध्देश पाटील, आयन तांबोळी व हनुमान चोपडे पुढे होते. सिध्देश पाटील याने आघाडी टिकवत ६५ किमी अंतर १ तास १८ मिनिटात पुर्ण केले, तर द्वितीय क्रमांकाच्या हनुमान चोपडे याने पटकावला तर तिसरा क्रमांक आयन तांबोळी याने मिळवला.

प्रथम क्रमांक- ११,०००/- रुपये व प्रशस्तिपत्रक

द्वितीय क्रमांक – ७,०००/- ——-“ ———

तृतीय क्रमांक- ३,०००/- ——- “ ———

ईतर ५ जणांना उत्तेजनार्थ – ५००/- व प्रशस्तिपत्रक देण्यात आले..!

स्पर्धेच्या संयोजनात संजय गवळी, गणेश गवळी, मंगेश बालगूडे, हेमंत मिंढे यांचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पदाधिकारी अनंता गांजवे, भोला वांजळे, नंदकुमार पापळ इ उपस्थित होते. प्रस्ताविक काळे यांनी तर आभार प्रदर्शन भोला वांजळे यांनी केले..!

——————————————//

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments