Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी...

*राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट*

 

 

*नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसह उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चर्चा*

 

मुंबई, दि. १३:- महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.

 

या भेटीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) ची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंग सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे तसेच तांत्रिक शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती उच्च व तंत्र शिक्षण

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपालांना दिली.

 

महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या क्षेत्रात देशात नेहमीच अग्रस्थानी राहिले असून राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी शासनाचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील उच्च शिक्षण अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल उपस्थित होते.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments