Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिसान मोटर इंडियाकडून पोलिस आणि निमलष्करी अधिकाऱ्यांसाठी खास लाभ देण्यासाठी केंद्रीय पोलिस...

निसान मोटर इंडियाकडून पोलिस आणि निमलष्करी अधिकाऱ्यांसाठी खास लाभ देण्यासाठी केंद्रीय पोलिस कल्याण भांडारसोबत सहयोग

 

गुरूग्राम, १२ मार्च २०२६: निसान मोटर इंडिया प्रा. लि. (एन.एम.आय.पी.एल.) ने आज केंद्रीय पोलीस कल्याण भंडार (के.पी.के.बी.) या भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (एम.एच.ए.) कल्याणकारी उपक्रमाशी समन्वय साधण्याची घोषणा केली. त्याचा उद्देश कार्यरत व निवृत्त पोलीस आणि निमलष्करी दलातील कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी वैयक्तिक मोबिलिटीची उपलब्धता सुधारणे हा आहे. हे सहकार्य निसान मोटर इंडियाचा आपल्या सुरक्षा दलांबद्दलचा आदर आणि विश्वासार्ह संस्थात्मक भागीदारीद्वारे अर्थपूर्ण मूल्यनिर्मिती करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

 

या सहयोगाचा एक भाग म्हणून केपीकेबीचे लाभार्थी असलेले विद्यमान ग्राहक लाभांव्यतिरिक्त न्यू निसान मॅग्नाइटच्या उत्पादन श्रेणीत विशेष लाभांसाठी पात्र असतील. हे लाभ भारतातील सर्व निसान डीलरशिप्सनालागू होतील. याशिवाय, ग्राहक ५.५५% आकर्षक फायनान्स ऑफरचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे परवडणाऱ्या दरात गाडी घेता येईल. एक विशेष ऑफर म्हणून निसान निवडक निसान मॉडेल्सवर केपीकेबी लाभार्थ्यांसाठी ३ वर्षांच्या प्रीपेड देखभाल कार्यक्रमाचा विस्तार करीत आहे.

 

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले की, निसान मोटर इंडियामध्ये देशसेवा आणि संरक्षण करणाऱ्या पुरुष आणि महिलांबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. केंद्रीय पोलीस कल्याण भांडारच्या सहकार्याने आमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचे वाहन देण्याची करण्याची आमची जबाबदारी आणि वचनबद्धता दिसून येते. या विशेष लाभ आणि आर्थिक पर्यायांद्वारे देशभरातील केपीकेबी लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी मूल्य देताना आम्हाला अभिमान वाटतो.”

 

निसान मॅग्नाइटच्या सातत्यपूर्ण यशाने वाढीचा भक्कम पाया रचला आहे. ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटच्या अनावरणाने कंपनीच्या विस्ताराच्या पोर्टफोलिओमधील आणखी एक निर्णायक टप्पा गाठला आहे. मजबूत वितरण यंत्रणा आणि नूतनीकृत उत्पादन धोरणासह निसान मोटर इंडिया आपल्या पुनरुज्जीवनाला गती देण्यासाठी आणि देशभरातील ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

के.पी.के.बी.च्या अनुषंगाने निसान निःस्वार्थपणे आपल्या देशाची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या शूर व्यक्तींच्या जीवनात अर्थपूर्ण, सकारात्मक परिणाम निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते.

 

अधिक माहितीसाठी www.nissan.in ला भेट द्या.

 

केंद्रीय पोलिस कल्याण भंडार (केपीकेबी)

केंद्रीय पोलीस कल्याण भंडार (केपीकेबी) ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय पोलीस संघटना, राज्य पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी १८ सप्टेंबर २००६ रोजी गृह मंत्रालयाने स्थापन केलेली किरकोळ कल्याणकारी प्रणाली आहे. केपीकेबी १९९ मोठी भांडारे आणि १७०० हून अधिक सहाय्यक भांडारांचे देशव्यापी जाळे चालवते. ते आघाडीच्या उत्पादकांसह विशेष व्यवस्थेद्वारे वाहनांसह अनुदानित ग्राहकोपयोगी वस्तूंची विस्तृत श्रेणी देऊ करते. भारतीय पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी अधिक बचत आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्पर्धात्मक किंमतींवर दर्जेदार उत्पादने वितरीत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबद्दल

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एन.एम.आय.पी.एल.) ची स्थापना २०१० मध्ये झाली असून ती निसान मोटर कंपनी लिमिटेड, जपानची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. तसेच ती ९० वर्षांहून अधिक नावीन्यपूर्ण आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह जागतिक ऑटोमोटिव्ह लीडर आहे. निसान आपल्या प्रतिष्ठित वाहनांसाठी, प्रगत गतिशीलता तंत्रज्ञानासाठी आणि कामगिरीवर आधारित डीएनएसाठी ओळखले जाते. ही गोष्ट त्यांच्या जागतिक स्तरावरील मोटरस्पोर्ट्सच्या उपस्थितीतून आणि पुरस्कारविजेत्या निसान लीफसह विद्युत वाहनांमधील आघाडीतून प्रतिबिंबित होते.

 

निसान मोटर इंडिया ६५ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत सेवा पुरवते आणि सध्या जागतिक स्तरावर दोन लाखांहून अधिक ग्राहकांना ऑल नवीन निसान ग्रॅव्हाइट आणि निसान मॅग्नाइटची किरकोळ विक्री करते. कंपनीने २०२५ मध्ये, एकूण १.२ दशलक्ष गाड्यांची निर्यात साध्य केली. त्यामुळे ती भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल निर्यातदारांपैकी एक ठरली. निसान मोटर इंडिया २८० हून अधिक ग्राहक टचपॉईंटसह व्यापक नेटवर्क, भारतकेंद्री उत्पादने आणि नावीन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ग्राहककेंद्री गतिशीलतेसाठी वचनबद्धतेच्या माध्यमातून आपली उपस्थिती मजबूत करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments