Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक भू-राजकीय अनिश्चितता असताना देखील पुण्‍यातील एसएमईंनी उत्तम विकासाचा आत्‍मविश्वास दाखवला

जागतिक भू-राजकीय अनिश्चितता असताना देखील पुण्‍यातील एसएमईंनी उत्तम विकासाचा आत्‍मविश्वास दाखवला

जागतिक बाजारपेठांमध्ये भू-राजकीय तणाव आणि व्यापार विस्कळीत झाल्यामुळे अस्थिरता असली तरी पुण्यातील लघु व मध्यम उद्योग (एसएमई) आपल्या विकासाच्या शक्यतांबद्दल दृढ आत्मविश्वास दाखवत आहेत. राष्ट्रीय निर्देशकांवरून निदर्शनास येते की, भारतीय लघु व मध्यम उद्योग स्थिर देशांतर्गत मागणी आणि धोरणात्मक व्यावसायिक नियोजनाच्या आधारावर विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी सिडबी (SIDBI) एमएसएमई आउटलुक सर्व्हेनुसार, आयात शुल्काचा दबाव असल्याने आशावादात काहीशी घट झाली असली तरी सणासुदीचा काळ, स्थिर बाजारपेठेतील मागणी आणि जीएसटीचे सुलभीकरण यांसारख्या धोरणात्मक उपायांमुळे आगामी तिमाहींसाठीच्या अपेक्षा सकारात्मक आहेत.

 

पीएचडी चेंबरच्या एसएमई मार्केट सेंटिमेंट इंडेक्सद्वारे या भावनांना अधिक बळकटी मिळत आहे. या निर्देशांकातून दिसून येते की, मागणी आणि रोजगाराबद्दल चिंता असूनही भारतातील सर्व उद्योजक भांडवली खर्चात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. पुरवठादारांच्या वितरण वेळापत्रकात झालेली सुधारणा आणि सक्रिय इन्व्हेंटरी धोरणे यामधून निदर्शनास येते की, व्यवसाय आगामी काळात वाढीव कामकाजासाठी सज्ज होत आहेत.

 

पुणे भारतातील सर्वात गतिशील एसएमई परिसंस्‍था म्हणून आपले स्थान टिकवून आहे. या जिल्ह्यात ४.५ लाखांहून अधिक नोंदणीकृत एमएसएमई आहेत, ज्यात जवळपास १ लाख उत्पादन युनिट्स आणि ३.५ लाख सेवा क्षेत्रातील उद्योग समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात वैविध्‍यपूर्ण एमएसएमई केंद्र बनले आहे. अभियांत्रिकीमधील कौशल्य, ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सेवा, अचूक उत्पादन आणि टॅलेंटची निरंतर उपलब्धता यांचे अद्वितीय संयोजन पुण्याला जागतिक अनिश्चिततेच्या काळात देखील स्पर्धात्मक अग्रणी स्‍थान देते. स्थानिक एसएमई सध्या वैविध्यीकरण, तंत्रज्ञान अपग्रेड आणि निर्यातीचा विस्तार करण्यासाठी सक्रियपणे गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे बाह्य आव्हाने असताना देखील त्यांची वाढ कायम ठेवण्याची क्षमता अधिक दृढ होत आहे.

 

या स्थिरतेला प्रकाशझोतात आणत कोटक महिंद्रा बँकेमधील एसएमई अध्‍यक्ष शेखर भंडारी म्‍हणाले, ”भारतातील एसएमई, विशेषतः पुण्यासारख्या औद्योगिक केंद्रांमधील उद्योग अपवादात्मक स्पष्टता आणि महत्त्वाकांक्षा दाखवत आहेत. त्यांचा शिस्तबद्ध, दीर्घकालीन दृष्टिकोन त्यांना लहान कंपनी म्हणून नाही, तर भविष्यातील मोठे समूह म्हणून प्रस्थापित करत आहे. हा प्रवास वाढीप्रती अतीव आवड आणि अनेक दशक टिकणाऱ्या शाश्वत व्यावसायिक मॉडेल्सच्या प्रयत्‍नातून प्रेरित आहे.”

 

अशा झपाट्याने विकसित होत असलेल्‍या औद्योगिक समूहांकडून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख एमएसएमई केंद्रांमध्ये आपली उपस्थिती विस्तारत आहे. या विस्तारामुळे प्रादेशिक पातळीवर उपस्थिती अधिक वाढवून आणि जलद आर्थिक सेवा उपलब्‍ध करून देऊन कोटक बँकेची एमएसएमईंना पाठबळ देण्याची क्षमता अधिक दृढ होत आहे.

 

अहमदनगर, बारामती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह व्यापक पुणे प्रदेश उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला आणि वैविध्‍यपूर्ण एसएमई कॉरिडॉर तयार करतो, जो या आत्मविश्वासाला अधिक दृढता देतो. प्रबळ औद्योगिक समूह, कुशल मनुष्यबळ, उत्तम पायाभूत सुविधा आणि उद्योजकीय वृत्तीमुळे हा प्रदेश उत्पादन, सेवा आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये एसएमईच्या विस्ताराला सक्षम करत आहे.

 

हा आशावाद चाकण, तळेगाव, रांजणगाव आणि हिंजवडी यांसारख्या पुण्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. येथील उद्योग ऑटोमेशन वाढवत आहेत, पुरवठा यंत्रणेची स्थिरता अधिक दृढ करत आहेत, विशेष उत्पादने विकसित करत आहेत आणि ग्राहक नेटवर्क विस्तारत आहेत. हे कल राष्ट्रीय निष्कर्षांशी सुसंगत आहेत, ज्‍यामधून निदर्शनास येते की एसएमई जागतिक स्तरावरील बदलत्या परिस्थितीनुसार मार्ग काढण्यासाठी कार्यक्षमता, स्थिरता आणि निवडक गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

 

उद्योगामधील निरीक्षकांच्या मते, पुण्यातील एसएमई त्यांच्या धोरणात्मक आणि भविष्याचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनामुळे इतर ठिकाणच्या उद्योगांपेक्षा वेगळे ठरतात. या दृष्टिकोनाला सुधारत असलेली लॉजिस्टिक व्यवस्था आणि शक्तिशाली देशांतर्गत पायाभूत सुविधांचा पाठिंबा मिळाला आहे.

 

परिणामत:, हे उद्योग जागतिक अनिश्चिततेचा सामना करण्‍यासोबत त्याचे रूपांतर शाश्वत वाढीच्या संधींमध्ये करत आहेत.

 

पुण्यातील आणि संपूर्ण भारतातील एसएमई त्यांच्या महत्त्वाकांक्षा, स्थिरता आणि दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीमध्‍ये म

हत्त्वाचे आहेत.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments